Kanchenjunga Express Accident नंतर ‘कवच सिस्टम’ची चर्चा का? नेमकं आहे तरी काय?

123
Kanchenjunga Express Accident नंतर 'कवच सिस्टम'ची चर्चा का? नेमकं आहे तरी काय?
Kanchenjunga Express Accident नंतर 'कवच सिस्टम'ची चर्चा का? नेमकं आहे तरी काय?

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी (17 जून) सकाळी कंचनजंगा एक्स्प्रेसला भीषण अपघात (Kanchenjunga Express Accident) झाला. मागून येणाऱ्या मालगाडीने उभ्या एक्स्प्रेसला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कवच’ सिस्टीम (Kavach system) बाबतची चर्चा सुरू झाली आहे. मग आता हे ‘कवच’ सिस्टीम नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Kanchenjunga Express Accident)

‘कवच’ सिस्टीम काय आहे ?

‘कवच’ सिस्टीम ही एक स्वदेशी अँटी प्रोटेक्शन सिस्टीम (APS) आहे, जी 2002 मध्ये रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO)ने तीन विक्रेत्यांच्या सहकार्याने विकसित केली होती. ट्रेनचे अपघात रोखण्यासाठी ते विशेषतः तयार केले गेले होते, जेणेकरून कोणतीही जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. 2022 च्या अर्थसंकल्पात ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत कवच सिस्टीमची घोषणा करण्यात आली होती, ज्या अंतर्गत रेल्वे नेटवर्क सुसज्ज केले जाणार होते. सध्या ते 1098 किमी मार्गावर आणि दक्षिण-मध्य रेल्वेमध्ये 65 लोकोमोटिव्हमध्ये स्थापित केले आहे. याशिवाय 1200 किलोमीटरचा मार्ग सुसज्ज करण्याचे काम सुरू आहे. (Kanchenjunga Express Accident)

‘कवच’ सिस्टीम काम कसे करते ?

जर ट्रेनने लाल सिग्नल असतानाही सीमा ओलांडली, तर तो सिग्नल पास्ड अॅट डेंजर (SPAD)मानला जातो. या स्थितीत, कवच सिस्टीम सक्रिय होते आणि ट्रेनवर स्वयंचलित ब्रेक लावते, ज्यामुळे ट्रेनचा वेग कमी होतो. जर ट्रेन ओव्हरस्पीडमध्ये असेल, तर ही यंत्रणा लागू होते आणि ट्रेनच्या ब्रेकचा वापर करून वेग कमी करते. त्याचबरोबर हवामान खराब असेल किंवा जास्त धुके असेल तर कवच सिस्टीमच्या मदतीने ट्रेन चालवता येते. हे सिग्नल यंत्रणेच्या मदतीने लोको-पायलटला ट्रेनच्या ऑपरेशनमध्ये मदत करते. कवच सिस्टीम ही कोणत्याही एका ट्रॅकवर दोन गाड्या असल्यास सिग्नल यंत्रणेच्या मदतीने माहिती घेऊन स्वयंचलित ब्रेक लावून ट्रेन थांबवते, ज्यामुळे दोन गाड्या एकत्र येण्यापासून रोखतात. एकाच ट्रॅकवर दोन गाड्यांची गर्दी टाळण्यासाठी ही सर्वात कार्यक्षम यंत्रणा मानली जाते. (Kanchenjunga Express Accident)

2022 मध्ये झाली होती चाचणी

मार्च 2022 मध्ये सिकंदराबाद, तेलंगणा येथे कवच सिस्टीमची चाचणी घेण्यात आली होती. एक ट्रेन आणि एक इंजिन एकाच ट्रॅकवर 160 किमी/तास वेगाने चालले होते.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनमध्ये प्रवास करत होते तर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष दुसऱ्या इंजिनमध्ये प्रवास करत होते. यावेळी समोरून येणाऱ्या इंजिनापासून अवघ्या 380 मीटर अंतरावर कवच सिस्टीम या प्राणलीने रेल्वेमंत्र्यांची गाडी थांबवली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.