मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी ShivSena UBT गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल

170
मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी Shiv Sena UBT गटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना (UBT)चे नेते विलास पोतनीस आणि त्यांच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ जून रोजी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील गोरेगाव (पू.) येथील नेस्को येथे मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्रात अनधिकृत प्रवेश आणि आवारात मोबाईल फोन वापरण्यावरून झालेला वाद या संदर्भात नोंद झालेला हा दुसरा गुन्हा आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२८ (बी), आचारसंहितेचे कलम ५४ आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (ShivSena UBT)

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ४८ मतांच्या फरकाने निवडून आलेले शिवसेनेचे रवींद्र वायकर (शिवसेना) यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पोतनीस यांनी त्यांच्या अंगरक्षकासह सायंकाळी ४.०० ते ८.०० या वेळेत मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याचा आरोप केला, मतमोजणी केंद्रात केवळ निवडणूक रिटर्निंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्राव्यतिरिक्त इतर कुणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश बंदी असताना पोतनीस यांनी आपल्या अंगरक्षकासह बेकायदेशीर प्रवेश केल्याचे आरोपात म्हटले आहे. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Mumbai Road Potholes : मुंबईत २२७ दुय्यम अभियंत्यांची रस्त्यांवरील खड्ड्यांवर नजर)

पत्रात असेही म्हटले आहे की, “या सर्व बाबी अत्यंत गंभीर आणि निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. तरी आपण या सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, ही विनंती करण्यात आली होती. वनराई पोलिसांनी या पत्रावरून तपास करून सोमवारी शिवसेना (UBT)चे नेते विलास पोतनीस आणि त्यांच्या सुरक्षारक्षकावर लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२८ (बी), आचारसंहितेचे कलम ५४ आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी वनराई पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकावरही मतमोजणी केंद्रात मोबाईल आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.