सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स वापरून पाहा

निरोगी जीवनशैलीसाठी आपला आहार सकस आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. त्यासाठी व्यायामासोबतच वेगवेगळी फळं, हिरव्या पालेभाज्या, भाज्या, डाळी, अंडी आणि सुकामेवा यांसारखे घटक आपल्या रोजच्या आहारात असावेत. सुक्या मेव्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात.

बरेच लोक त्यांच्या नियमित आहारात देखील याचा समावेश करू शकतात. रोज मूठभर ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. पण जर तुम्ही ड्रायफ्रुट्स नीट साठवले नाहीत तर ते खराबही होऊ शकतात. काही सोप्या टिप्स फॉलो करून सुका मेवा वर्षानुवर्षे ताजे आणि कुरकुरीत ठेवता येतात हे तुम्हाला माहीत आहे का? चला तुम्हाला सुका मेवा व्यवस्थित साठवण्याच्या टिप्स सांगतो.

एअरटाइट कंटेनर तुम्ही एअरटाइट कंटेनर वापरू शकता. यामुळे सुका मेवा जास्त काळ साठवून ठेवता येतो. त्यामुळे ड्राय फ्रुट्स अनेक दिवस ताजे राहतील. हे खराब होण्याची शक्यता कमी असते.

थंड आणि कोरडी जागा बहुतेक लोक सुका मेवा स्वयंपाकघरात ठेवतात. अशा परिस्थितीत, आपण त्यांना थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे. याच्या मदतीने तुम्ही ड्राय फ्रूट्स दीर्घकाळ ताजे ठेवू शकाल. सुका मेवा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या ठिकाणी ठेवल्यास ते खराब होऊ शकतात.

भाजून ठेवणे जर ड्रायफ्रुट्स लवकर खराब होणार असतील तर तुम्ही ते भाजून घेऊ शकता. तुम्ही त्यांना ओव्हनमध्ये ५ मिनिटे भाजून घेऊ शकता. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही ते भाजण्यासाठी फ्राय पॅन देखील वापरू शकता.