Chhatrapati Sambhajinagar News: गाडी चालवताना रिल्स करणं तरुणीच्या बेतलं जीवावर; तुम्ही करू नका ‘ही चूक’!

233
Chhatrapati Sambhajinagar News: गाडी चालवताना रिल्स करणं तरुणीच्या बेतलं जीवावर; तुम्ही करू नका ‘ही चूक’!

सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळावी यासाठी आजच्या तरुण पिढीला रिल्सचे वेड लागले आहे. रिल्स (Reels) तयार करण्यासाठी अनेकदा स्टंटबाजी केली जाते, तर बऱ्याचदा हे रिल्स तयार करणे अनेकांच्या जीवावर बेतते. अशाच पद्धतीने रिल्स तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणीने आपला जीव गामावल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chambhajinagar) घडली आहे. कारमध्ये बसून रिल्स (Reels) बनवत असताना तरूणी कारसोबत दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दौलताबाद (Daulatabad) परिसरातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. (Chhatrapati Sambhajinagar News)

(हेही वाचा – Crime : स्मशानभूमीत झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला)

मिळालेल्या माहितीनुसार, श्नेता सुरवसे (Shweta Suravse)  ही मित्र शिवराज संजय मुळे (Shivraj Sanjay Mule) याच्यासोबत सोमवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथून कारमधून (क्रमांक एम.एच.२१,बी.एच.०९५८) सुलीभंजन (Sulibhanjan) येथील दत्त मंदिर परिसरात आली होती. येथे श्वेताने कार चालवताना असतानाचे रिल्स बनविण्यास शिवराज यास सांगितले. मात्र, रिव्हर्स गिअर पडून एक्सलेटवर दाब पडल्याने कार वेगाने मागे जात थेट डोंगरावरुन खाली दरीत कोसळली. या भीषण अपघातात श्वेताचा जागीच मृत्यू झाला. (Chhatrapati Sambhajinagar News)

(हेही वाचा – Agniveer Recruitment साठी वायुसेनेची ऑक्टोबरमध्ये परीक्षा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज)

घटनास्थळी खुलताबाद पोलीसांनी पंचनामा करून मुला- मुलींच्या नातेवाईकांना बोलवून घेतले आहे. वाहन चालवता येत नसताना ते बळजबरीने चालवून स्वत:च्या अथवा इतरांच्या जिवाच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच मंदिर परिसरातील डोंगराच्या बाजूला कठडे असते तर ही घटना घडली नसती. (Chhatrapati Sambhajinagar News)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.