Indian Navy: भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश

187
Indian Navy: भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश

भारतीय नौदल ‘प्रोजेक्ट 75 इंडिया (P75I) अंतर्गत स्पेनमध्ये अत्याधुनिक उपकरणांची चाचणी घेणार आहे. या चाचणीनंतर भारतीय नौदल आपल्या ताफ्यात सहा आधुनिक पाणबुड्यांचा (Six modern submarines) समावेश करणार असल्याचे स्पॅनिश जहाजबांधणी कंपनी ‘नवांतिया’ (Navantia) ने म्हटले आहे. (Indian Navy)

नवांतियाचे अध्यक्ष रिकार्डो डोमिंग्वेझ गार्सिया बाकेरो म्हणतात की, स्पॅनिश सरकार आणि नौदल P75I बद्दल खूप उत्साहित आहेत आणि या प्रकल्पात भारताला सर्व प्रकारे मदत करू इच्छितात. या योजनेअंतर्गत भारत सरकारसोबत करार केला जाईल. नवांतिया प्रमुख म्हणाले की, जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून भारतीय नौदल कार्टाजेना येथील शिपयार्डमध्ये एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (API) चाचण्या सुरू करेल. (Indian Navy)

(हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar News: गाडी चालवताना रिल्स करणं तरुणीच्या बेतलं जीवावर; तुम्ही करू नका ‘ही चूक’!)

या चाचणीत लार्सन अँड टर्बो (L&T) कंपनी साथ देईल, असे रिकार्डो डोमिंग्वेझ म्हणाले. चाचण्यांदरम्यान भारतीय नौदलाला जागतिक दर्जाचे एआयपी तंत्रज्ञान दिले जाईल. भारतीय नौदल एआयपी तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सहा पाणबुड्या घेणार असल्याची माहिती पुढे आली. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणबुड्या दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकतात. भारतीय नौदलाकडे पूर्वी एआयपी प्रणाली असलेल्या पाणबुड्या नव्हत्या. (Indian Navy)

(हेही वाचा – Agniveer Recruitment साठी वायुसेनेची ऑक्टोबरमध्ये परीक्षा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज)

L&T आणि Navantia सोबत, जर्मनीची ThyssenKrupp Marine Systems आणि भारताची Mazgaon Dockyards Limited यांचाही सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात सहभाग आहे. Navantiaने भारतीय नौदलाच्या प्रकल्पासाठी S-80 पाणबुडीचे डिझाइन देऊ केले आहे. यातील एक पाणबुडी 2024 साली स्पॅनिश नौदलात सामील झाली आहे. Navantia ने दावा केला की S80 चे खास वैशिष्ट्य म्हणजे ते P75(I) च्या तंत्रज्ञानाच्या गरजा कोणत्याही रीडिझाइनची आवश्यकता न ठेवता सहजपणे पूर्ण करते. (Indian Navy)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.