समाजवादी सिद्धांताची मागणी करणारे जर्मन तत्वज्ञ Axel Honneth

127
समाजवादी सिद्धांताची मागणी करणारे जर्मन तत्वज्ञ Axel Honneth
समाजवादी सिद्धांताची मागणी करणारे जर्मन तत्वज्ञ Axel Honneth

एक्सेल होनेथ (Axel Honneth) यांचा जन्म १८ जुलै १९४९ साली जर्मनीच्या पश्चिम भागातल्या एसेन येथे झाला. त्यांनी बॉन, बर्लिन येथे जर्गन हॅबर्मस यांच्या अंतर्गत येथे शिक्षण घेतलं. मग ते बर्लिनच्या फ्री युनिव्हर्सिटी आणि न्यू स्कूलमध्ये शिकवू लागले. त्यानंतर काही काळाने ते जोहान वुल्फगँग गोएथे-विद्यापीठात गेले. १९९९ साली त्यांना ॲमस्टरडॅम विद्यापीठात ‘स्पिनोझा चेअर ऑफ फिलॉसॉफीचं’ पॅड देण्यात आलं.

एक्सेल होनेथ (Axel Honneth) हे २००१ ते २०१८ सालादरम्यान इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिसर्चचे संचालक होते. २०११ सालापासून ते न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठातल्या तत्त्वज्ञान या विभागातले प्राध्यापकही आहेत.

एक्सेल होनेथ (Axel Honneth) यांचं कार्य सामाजिक-राजकीय आणि नैतिक तत्त्वज्ञानावर आधारित आहे. जसे की, शक्ती/पद, मान्यता आणि आदर यांचे परस्पर संबंध वैगरे. त्यांच्या मूळ युक्तिवादांपैकी एक म्हणजे ‘सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी ओळखीच्या अंतर्व्यक्ती संबंधांना प्राधान्य देणे होय.

(हेही वाचा – Indian Navy: भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश)

त्यांचं पहिलं पुस्तक ‘द क्रिटिक ऑफ पॉवर: रिफ्लेक्टीव्ह स्टेज इन अ क्रिटिकल सोशल थिअरी’ हे आहे. या पुस्तकात त्यांनी फ्रँकफर्ट स्कूल आणि मिशेल फुकॉल्ट यांच्यातील स्नेहसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच त्यांच्या दुसऱ्या ‘द स्ट्रगल फॉर रिकग्निशन: मॉरल ग्रामर ऑफ सोशल कॉन्फ्लिक्ट्स’ नावाच्या पुस्तकात जी.डब्ल्यू.एफ. हेगेलच्या सुरुवातीच्या सामाजिक तात्विक कृतींमधून घेतली गेलेली संकल्पना आहे. त्याबरोबरच जॉर्ज हर्बर्ट मीडचं सामाजिक मानसशास्त्र, जर्गन हॅबर्मस यांचं संप्रेषणशास्त्र, नीतीशास्त्र या विषयावरही त्यांनी लिहिलं आहे.

तसंच डोनाल्ड विनिकॉटचा ऑब्जेक्ट रिलेशनशिपचा सिद्धांतही आहे. एक्सेल होनेथ यांनी या सर्व गोष्टींचं पुस्तकात केलेलं रुपांतर हा त्यांच्या सामाजिक सिद्धांताचा आधार आहे. त्या पुस्तकात त्यांनी पूर्वीच्या दृष्टिकोनातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

(हेही वाचा – सुका मेवा लगेच होतो खराब? मग ‘या’ टिप्स वापरून पाहा)

२००३ साली एक्सेल होनेथ (Axel Honneth) यांनी स्त्रीवादी तत्वज्ञानी नॅन्सी फ्रेझर यांच्या नैतिक श्रेणींच्या प्राधान्यावर टीका केली आहे. ‘द आयडिया ऑफ सोशॅलिझम’ या पुस्तकात एक्सेल होनेथ (Axel Honneth) यांनी २१व्या शतकासाठी समाजवादी सिद्धांताची पुनरावृत्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांचं हे पुस्तक ऐतिहासिक भौतिकवादाच्या समाजवादी सिद्धांताच्या टीकेवर आधारित आहे. राजकीय हक्कांचे अज्ञान आणि आधुनिक समाजातली सामाजिक भिन्नता या विषयांवर त्यांनी जास्त जोर दिला आहे.

क्रांतिकारी विषय म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीची तीन तत्त्वे पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी एक्सेल होनेथ (Axel Honneth) यांनी काही नियम सुचवले. ते म्हणजे, जॉन ड्यूईने प्रेरित होऊन ऐतिहासिक प्रयोगांसह आर्थिक निर्धारवादाची जागा घेणे. सामाजिक स्वातंत्र्याचा विस्तार करणे. जसे की, समाजातील सदस्यांमधील परस्पर अवलंबन आणि सहकार्य. आधुनिक समाजाच्या इतर क्षेत्रांमध्ये म्हणजे राजकीय, खाजगी आणि लोकशाही क्षेत्रातल्या सर्व नागरिकांना संबोधित करणे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.