Lok Sabha Speaker पदी महिला नेत्या दिसणार ?; काय आहे भाजपची रणनिती…

मित्रपक्ष तेलुगु देसमला उपाध्यक्षपद देण्यास भाजप तयार आहे. Lok Sabha Speaker पदासाठी लोकसभा मित्रपक्षांची सहमती मिळविण्याची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे.

317
Lok Sabha Speaker पदी महिला नेत्या दिसणार ?; काय आहे भाजपची रणनिती...
Lok Sabha Speaker पदी महिला नेत्या दिसणार ?; काय आहे भाजपची रणनिती...

लोकसभा निवडणुकीनंतर (loksabha election 2024) भाजपा मित्रपक्षांना किती मंत्रीपदे दिली, याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षपद कुणाकडे रहाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

याविषयी भारतीय जनता पक्ष लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार आहे, असे समजते. मित्रपक्ष तेलुगु देसमला उपाध्यक्षपद देण्यास भाजप तयार आहे. अध्यक्षपदासाठी लोकसभा मित्रपक्षांची सहमती मिळविण्याची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. लोकसभा अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे.

(हेही वाचा – India Nuclear Power : भारताने अणूबाँबच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानला टाकले मागे)

नायडू यांच्या मेहुणी पुरंदेश्वरी होणार अध्यक्ष ?

भाजपने चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी पुरंदेश्वरी (Daggubati Purandeswari) यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले आहे. अध्यक्षपद न देण्यामागील चंद्राबाबू नायडूंची नाराजीही याने दूर होईल. आंध्र प्रदेशात भाजप आणि टीडीपी यांच्यात युती करण्यातही पुरंदेश्वरी यांचा मोठा वाटा आहे. मात्र, भाजपने आणखी 2-3 तीन नावे पुढे केली आहेत. मित्रपक्षांमध्ये यापैकी ज्या नेत्याच्या नावावर एकमत होईल, त्यांना लोकसभा अध्यक्ष केले जाईल. २४ जूनपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. २६ जून रोजी अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

तेलगू देसम पक्षाकडून त्यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठी भाजपवर दबाव आणला जात आहे. विद्यमान सरकारमध्ये अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने भाजपला हे पद स्वतःकडेच ठेवायचे आहे. यासंदर्भात भाजप चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, चिराग पासवान, एकनाथ शिंदे, अजित पवार या सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांशी बोलून त्यांची सहमती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.