Boriwali Skywalk : महापालिकेच्या डोळ्यांवर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची प्रतीक्षा

1399
Boriwali Skywalk : महापालिकेच्या डोळ्यांवर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची प्रतीक्षा
Boriwali Skywalk : महापालिकेच्या डोळ्यांवर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची प्रतीक्षा
  • सचिन धानजी,मुंबई

बोरीवली पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या शेजारील स्कायवॉक हे नक्की कुणासाठी बांधले हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका आर मध्य विभाग कार्यालयाच्या नाकासमोर हे स्कायवॉक (Boriwali Skywalk) असून यावरील उखडलेल्या लाद्यांमुळे पादचाऱ्यांना धड चालताही येत नाही. पण दिसत असतानाही महापालिकेच्य विभागीय अधिकाऱ्यांसह पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे, आणि त्यांना आता केवळ प्रतीक्षा आहे की कोणी तरी पादचारी जायबंदी होऊन पडण्याची. त्यामुळे कोणी पडून झडून जखमी झाल्यानंतरच महापालिका या स्कायवॉकची (Boriwali Skywalk) डागडुजीचे काम करणार का असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

New Project 10 4

बोरीवली (पश्चिम) येथील एस व्ही मार्गावरील सध्या अस्तित्वात असलेली आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉक (Boriwali Skywalk) हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम. एम. आर. डी. ए) मार्फत सन २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक सन २०१५ साली एम.एम.आर.डी.ए. कडून “जसे आहे तसे ” या तत्वावर मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते. त्यानुसार या स्कायवॉकची (Boriwali Skywalk) देखभाल महापालिकेच्यावतीने केली जात आहे. बोरीवली पश्चिम भागातील नागरिकांना एस व्ही रोडवरील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना धड चालता येत नाही म्हणून रेल्वे स्थानक थेट गाठण्यासाठी या स्कायवॉकचे बांधकाम करण्यात आले. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात याची योग्य देखभालच महापालिकेच्यावतीने योग्य प्रकारे केली जात नाही.

(हेही वाचा – Lok Sabha Speaker पदी महिला नेत्या दिसणार ?; काय आहे भाजपची रणनिती…)

जिने चढताना, उतरताना लक्ष विचलित झाल्यास घालिन लोटांगण

एका बाजुला सुशोभीकरणाच्या नावावर या स्कायवॉकवर (Boriwali Skywalk) कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रखर दिवे बसवून विद्युत रोषणाई करण्यावर भर देणाऱ्या महापालिका पूल विभागाला येथील प्रत्येक जिन्यावरील उखडलेल्या लाद्या आणि त्यांच्या लोखंडी पट्ट्या वर आलेल्या दिसत नाही. एस व्ही रोडवरील पोलिस स्टेशनसमोरील जिना आणि त्यानंतर ठक्कर शॉपिंग सेंटरकडे उतरणारा जिना आणि मोक्ष मॉलकडे दोन्ही बाजुला उतरणारे जिने यांच्या पायऱ्यांवरील लाद्या मागील अनेक महिन्यांपासून उखडल्या गेल्या आहेत. या लाद्या उखडल्याने आता समोरील लोखंडी पट्टी राहिलेली असून नागरिकांना या सर्व जिन्यांवरून उतरताना किंवा चढताना डोळ्या तेल घालून चालावे लागते. हे जिने चढताना किंवा उतरताना कुणा पादचाऱ्याचा लक्ष विचलित झाल्यास त्यांना लोटांगण घालण्याची वेळही येते. आजवर या घटना घडत असताना कोणतीही मोठी दुर्घटना न झाल्याने पूल विभागाचे अधिकारी बेफिकीरपणे वागत आहे.

New Project 11 4

विद्युत रोषणाईवर सुमारे साडेपाच कोटींचा खर्च

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या मुंबई सौदर्यीकरणाचे प्रकल्प याअंतर्गत मुंबईतील १३ स्कायवॉक (Boriwali Skywalk) सुशोभित करण्याच्यादृष्टीकोनातून त्यावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली. या बोरीवली पश्चिम मधील या स्कायवॉकसह १३ स्कायवॉकच्या विद्युत रोषणाईवर तब्बल ७४ कोटी रुपये खर्च केले गेले.त्यामुळे प्रत्येक स्कायवॉकचा सरासरी खर्च हा साडेपाच कोटी रुपये एवढा होता आणि सुशोभीकरणाच्या नावावर कंत्राटदाराचे खिसे भरण करणाऱ्या महापालिका प्रशासनाला पादचाऱ्यांना चालण्यास निट जिनेही उपलब्ध करून दिले जात नाही.

(हेही वाचा – West Bengal Train Accident : “आमच्या बोगीला अचानक जोरदार धक्का बसला आणि…” प्रवाशाने सांगितला अपघातावेळीचा प्रसंग!)

स्कायवॉकवर फेरीवाले आणि अनेकांचे संसार

एसव्ही रोड गिळंकृत करणाऱ्या फेरीवाल्यांनी आता स्कायवॉकवरही (Boriwali Skywalk) आपले लक्ष वेधले असून आता त्यांनी तिथेही जागा अडवून धंदे थाटले आहेत. तसेच गजरे विणणाऱ्या महिलांनीही आपले संसार या स्कायवॉकवरच थाटल्याने पादचाऱ्यांनाही चालताना अडचणींना तोंड द्यावे लागते. एका बाजुला फेरीवाल्यांची समस्या आणि दुसरीकडे चालण्यास योग्य असे स्कायवॉक नसल्याने एक तर हे स्कायवॉक पूर्णपणे तोडून तरी टाका नाही तर त्याची डागडुजी करून पादचाऱ्यांना सुलभपणे चालता येईल अशाप्रकारची व्यवस्था करून दिली जावी असा संताप स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जाताना दिसत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.