Shiv Rajyabhishek Committee : श्री शिवराज्याभिषेक समितीला मिळाली प्राचीन सुवर्ण ‘पद्मटंका’ नाण्याची भेट 

Shri Shiv Rajyabhishek Committee : हे दुर्मिळ नाणे चंद्रपूर स्थित महाराष्ट्रातील ज्येष्ठ नाणी संग्राहक आणि अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याकडून श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीला भेट देण्यात येणार आहे.

204
Shri Shiv Rajyabhishek Committee : श्री शिवराज्याभिषेक समितीला मिळाली प्राचीन सुवर्ण 'पद्मटंका' नाण्याची भेट 
Shri Shiv Rajyabhishek Committee : श्री शिवराज्याभिषेक समितीला मिळाली प्राचीन सुवर्ण 'पद्मटंका' नाण्याची भेट 

नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले देवगिरीच्या यादव राजांचे साम्राज्य म्हणजे महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार तसेच स्थापत्यादी दृष्ट्या भरभराटीचा कालखंड होता.किल्ले देवगिरी ही त्यांची राजधानी. सोन्याचे ‘पद्मटंका’ हे त्यांचे नाणे. या दुर्मिळ सुवर्ण नाण्याचे वजन साधारण ३.८० ग्रॅम असून नाण्याच्या वरील बाजूस कन्नड मध्ये ‘श्री’ तसेच देवनागरीमध्ये ‘श्रीराम’, त्याखाली बाणाचे चिन्ह, मध्यभागी पद्म (कमळ) व त्याखाली शंख अशी रचना असते. हे सुवर्ण नाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभ मुहूर्तावर किल्ले रायगडच्या राजसदरेवरून शिवराज्याभिषेक समितीस भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. (Shiv Rajyabhishek Committee )

(हेही वाचा – पदवीधर निवडणुकीत कोकणात महायुतीच्या Niranjan Davkhare यांची वाट सोपी)

१९९५ पासून साजरा होतो शिवराज्याभिषेक दिनोत्सव

हे दुर्मिळ नाणे चंद्रपूर स्थित महाराष्ट्रातील ज्येष्ठ नाणी संग्राहक आणि अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याकडून श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीला भेट देण्यात येणार आहे. सन १९९५ पासून श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती ही संस्था, लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर करत आहे.

यंदाचे वर्ष हे स्वस्ति श्री ३५०व्या राज्याभिषेक शकाचे सांगता वर्ष असून, ३५१ वा शिवशक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, दि. २० जून २०२४ रोजी सुरू होणार आहे. समितीच्या आजवरच्या याच कार्याची दखल घेऊन सर यांनी ‘पद्मटंका’ या नाण्याची भेट समितीला दिली आहे. महाराष्ट्रातील तमाम इतिहासप्रेमी व शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अशोक सिंह ठाकूर यांचे आभार मानण्यात आले आहेत. (Shiv Rajyabhishek Committee)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.