-
ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) पुन्हा आमने सामने येत आहेत. दोन्ही संघांनी आपापल्या गटांत अव्वल स्थान पटकावत सुपर ८ गाठली आहे. आता सुपर ८ मध्ये एकाच गटात असल्यामुळे २४ जूनला सेंट ल्युसियाच्या डॅरन सॅमी मैदानावर ते आमने सामने येतील. पण, अशाप्रकारे हे दोन बलाढ्य संघ आमने सामने यावेत हे पूर्वनियोजित होतं का? सोशल मीडियावर हा प्रश्न सध्या विचारला जातोय. आणि या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असंच आहे.
गटवार साखळी ही चार गटांमध्ये विभागलेली होती. आणि प्रत्येक गटांतील संघांना क्रमवारी देण्यात आली होती. आणि साखळीत अग्र मानांकन मिळालेला संघ पुढेचाल करू शकला नाही तर ते मानांकन पुढे जाणाऱ्या संघाला देण्यात येईल, असा नियम होता. पाकिस्तानच्या बाबतीत ही शक्यता खरी ठरली. म्हणजे सुरुवातीला गटवार साखळीत त्यांना ए२ असं मानांकन होतं. भारतीय संघ ए१ होता. पण, ते सुपर ८ मध्ये पोहोचले नाहीत म्हटल्यावर दुसरा क्रमांक आपोआप अमेरिकेला मिळाला. (T20 World Cup)
(हेही वाचा – T20 World Cup, India in WI : वेस्ट इंडिजला पोहोचल्यावर भारतीय खेळाडूंनी सगळ्यात आधी काय केलं?)
आयसीसीने पहिल्यांदाच स्पर्धेपूर्वी संघांना अशाप्रकारे मानांकन बहाल केलं होतं. आधी सांगितल्या प्रमाणे भारतीय संघाला ए गटात अव्वल मानांकन होतं. आणि तेव्हाच सुपर ८ चं चित्रही काहीसं स्पष्ट होतं. कुठल्या गटातील अव्वल दोन संघ भारताबरोबर असणार हे आधीच ठरलेलं होतं (जर ते संघ गटावार साखळीनंतर अव्वल दोन संघ राहिले तर). भारताबरोबर सुपर ८ मध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हेच संघ असतील याचा अंदाज त्यामुळे आलेला होता. (T20 World Cup)
The schedule for the Super Eight stage of the #T20WorldCup has now been finalised 👀
Details ➡ https://t.co/aGL9xFje0A pic.twitter.com/FKqtnBXxrW
— T20 World Cup (@T20WorldCup) June 17, 2024
(हेही वाचा – Boriwali Skywalk : महापालिकेच्या डोळ्यांवर पट्टी, पादचाऱ्यांनी पडून जायबंदी होण्याची प्रतीक्षा)
मानांकनाचा एक अर्थ असा की, गटवार साखळीत संघ पहिल्या स्थानावर होता की, दुसऱ्या हे सुपर ८ मधील गटवारीसाठी महत्त्वाचं नव्हतं. फक्त गटातील दोन अव्वल खेळाडूंना १ आणि २ असं मानांकन मिळेल इतकाच त्याचा अर्थ होता. यासाठी ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देता येईल. बी गटात ऑस्ट्रेलियाला बी२ मानांकन होतं. आणि साखळीत त्यांनी चारही सामने जिंकून ८ गुणांसह गटात अव्वल क्रमांक पटकावला. पण, गटात अव्वल असले तरी त्यांचं मानांकन हे बी२ राहिलं. आणि आधी ठरल्याप्रमाणे बी२ मानांकनामुळे तो सुपर ८ मध्ये पूर्वनियोजित भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या गटात आले. (T20 World Cup)
संघांना स्पर्धेचा कार्यक्रम नीट समजावा आणि त्यानुसार, दौऱ्यातील सामन्यांसाठीची आखणी करता यावी, यासाठी यंदा आयसीसीने मानांकन योजना राबवली. कारण, त्यामुळे सुपर ८ गट आणि अगदी उपान्त्य फेरीविषयी नीट कल्पना स्पर्धेच्या आधीपासून येते. आणि नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं. (T20 World Cup)
(हेही वाचा – Agniveer Recruitment साठी वायुसेनेची ऑक्टोबरमध्ये परीक्षा; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज)
स्पर्धेपूर्वीचं मानांकन पाहूया,
भारत – ए१
पाकिस्तान – ए२
इंग्लंड – बी१
ऑस्ट्रेलिया – बी२
न्यूझीलंड – सी१
वेस्ट इंडिज – सी२
दक्षिण आफ्रिका – डी१
श्रीलंका – डी२
या मानांकनानुसार सुपर ८ मध्ये झालेली वर्गवारी पाहूया,
गट पहिला – ए१, बी२, सी१, डी२ (भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व बांगलादेश)
गट दुसरा – ए२, बी १, सी२, डी१ (अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community