Spying for Pakistan : आयएसआयच्या हेरांनी कसा हॅक केला शास्त्रज्ञाचा लॅपटॉप

173
Spying for Pakistan : आयएसआयच्या हेरांनी कसा हॅक केला शास्त्रज्ञाचा लॅपटॉप
Spying for Pakistan : आयएसआयच्या हेरांनी कसा हॅक केला शास्त्रज्ञाचा लॅपटॉप

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा ब्रह्मोस एरोस्पेस (BrahMos Aerospace) प्रायव्हेट लिमिटेडचा शास्त्रज्ञ निशांत अग्रवालला (Nishant Agarwal) नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. निशांतच्या लॅपटॉपमध्ये आयएसआयच्या हेरांनी 3 ऍप्सच्या माध्यमातून घुसखोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. (Spying for Pakistan)

(हेही वाचा – T20 World Cup, Pakistan Exit : पाकिस्तानचा संघ लंडनमध्ये घालवणार सुट्टी)

निशांत अग्रवालचे बिंग कसे फुटले ?

आयआयटीमधून शिक्षण पूर्ण करणारा निशांत अग्रवाल अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. त्यामुळ कमी वयात त्याला क्षेपणास्त्र बनवणाऱ्या ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नागपूर युनिटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली होती. पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेची गुप्तहेर सेजल हिने आणखी मोठ्या नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याशी संपर्क केला होता. निशांतने लिंक्ड-इनवर सेजलशी चॅट केले होते, सेजलने इंग्लंडच्या हेस एव्हिएशनमध्ये रिक्रूटर म्हणून ओळख दिली आणि निशांतला 2017 मध्ये नोकरीची ऑफर दिली होती. त्यानंतर निशांतला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवले होते. तसेच त्याच्या माध्यमातून ब्रह्मोसशी संबंधित महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती पाकिस्तानला मिळाली आणि नंतर आयएसआयने ही माहिती अमेरिकेला देखील पुरवली होती. त्यानंतर उत्तरप्रदेश एटीएसला एका दहशतवाद्याच्या चौकशीत निशांत अग्रवाल संदर्भात माहिती मिळाली आणि त्याचे बिंग फुटले होता. त्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संयुक्त कारवाईत ऑक्टोबर 2018 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

निशांतच्या लॅपटॉपवर इन्स्टॉल केली ३ अॅप्स

याप्रकरणी निशांत अग्रवालवर भादंविच्या विविध कलमांसोबतच आयटी कायद्याच्या कलम 66(एफ) आणि अधिकृत गुप्तता कायद्याच्या विविध कलमांखाली दंडनीय गुन्ह्यासाठी न्यायालयाने निशांतला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235 अन्वये दोषी ठरवले. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसचे तपास अधिकारी पंकज अवस्थी यांनी निशांतच्या खटल्यादरम्यान दिलेल्या जबाबात सांगितले होते की, पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या सेजलच्या सूचनेनुसार निशांत अग्रवालने तिने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले आणि मध्ये त्याच्या वैयक्तिक लॅपटॉपवर तीन ॲप्स स्थापित केले.

हे ॲप्स होते क्यू-विस्पर (QWhisper), चॅट टू हायर (Chat to Hire) आणि एक्स-ट्रस्ट (X-Trust) हे तीन ऍप मालवेअर होते ज्याद्वारे निशांतचा लॅपटॉपमधून डेटा चोरला होता. निशांतच्या लॅपटॉपमध्ये अनेक गोपनीय माहिती होती. निशांतच्या वैयक्तिक संगणकांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर एटीएस आणि गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला संपूर्ण अहवाल सादर केला असून भविष्यात अशा प्रकारच्या मालवेअर ऍप्सचा धोका टाळाण्याबाबत विशेष दिशानिर्देश जारी केले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.