-
ऋजुता लुकतुके
हा टी-२० विश्वचषक पाक संघासाठी विसरण्यासारखाच ठरला. (T20 World Cup, Pakistan Exit) अमेरिकेकडून झालेल्या पराभवानंतर मियामीतील पाऊस अमेरिकन संघाच्या मदतीला धावून आला. आणि पाक संघाला ४ गुणांसह गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर खेळाडूंवर माजी खेळाडूंकडून जगभर टीका होत आहे. अशावेळी पाक खेळाडूंनी स्पर्धेतील मुक्काम संपल्यावर मायदेशी जाण्यापूर्वी लंडनला सुट्टी घालवायचं ठरवलं आहे. कर्णधार बाबर आझम, मोहम्मद आमीर, इमाद वसिम, हॅरिस रौफ, शादाब खान आणि आझम खान या ६ खेळाडूंनी लंडनला जाण्याची परवानगी पाक मंडळाकडे मागितली आहे. (T20 World Cup, Pakistan Exit)
काहींना आपले कुटुंबीय आणि मित्रांबरोबर वेळ घालवायचा आहे. तर बहुतेक सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये स्थानिक लीग खेळण्याची चाचपणी करणार आहेत. काहींना काऊंटी क्रिकेटमध्येही आपलं नशीब आजमावायचं आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि सहाय्यक प्रशिक्षक अझर मेहमूद हे मायदेशी परतणार आहेत. (T20 World Cup, Pakistan Exit)
(हेही वाचा – लष्कर आणि हवाई दलाच्या ताफ्यात Light Combat Helicopters दाखल होणार)
पाक संघासाठी येत्या काही महिन्यात कुठलीही आंतरराष्ट्रीय मालिका नाही. त्यामुळे पाक मंडळानेच कर्स्टन यांना मायदेशी जाण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा समावेश ए गटात झाला होता. आणि त्यांनी भारताबरोबरच यजमान अमेरिकेविरुद्धचा सामनाही गमावला. त्यानंतर कॅनडाविरुद्ध ७ गडी राखून आणि आयर्लंड विरुद्ध निसटता विजय त्यांनी मिळवला असला तरी ४ गुणांसह ते गटात तिसरे आले. तर अमेरिकन संघ ५ गुणांसह दुसरा आला. आणि त्यांनी सुपर ८ मध्ये मजल मारली. (T20 World Cup, Pakistan Exit)
पाकिस्तानी संघ आता ऑगस्ट महिन्यात बांगलादेशबरोबर २ कसोटींची एक मालिका खेळणार आहे. तर ऑक्टोबरमध्ये पाक संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाईल. (T20 World Cup, Pakistan Exit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community