Fastest T20 Hundred : इस्टोनियाच्या साहिल चौहानचं २७ चेंडूंत शतक

साहिलने १८ षटकार आणि २४ चौकारांची आतषबाजी केली

167
Fastest T20 Hundred : इस्टोनियाच्या साहिल चौहानचं २७ चेंडूंत शतक
Fastest T20 Hundred : इस्टोनियाच्या साहिल चौहानचं २७ चेंडूंत शतक
  • ऋजुता लुकतुके

इस्टोनिया देशाच्या साहिल चौहानने (Sahil Chauhan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीचे अनेक विक्रम सोमवारी तोडून मोडून टाकले आहेत. गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणं म्हणजे काय याची नवीन व्याख्या करताना त्याने सर्वात वेगवान शतक (Fastest T20 Hundred) झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आणि सायप्रस विरुद्ध त्याने टी-१० प्रकारात चक्क २७ चेंडूंत शतक पूर्ण केलं. सामन्यात त्याने एकूण १४४ धावा केल्या त्या ४१ चेंडूंत. त्याने एकट्याने १८ षटकार ठोकले..

नामिबियाच्या जॅन निकोल लोफ्टी-ईटनचा ३३ चेंडूंमध्ये शतकाचा विक्रम चौहानने मागे टाकला. (Fastest T20 Hundred)

(हेही वाचा – T20 World Cup, Pakistan Exit : पाकिस्तानचा संघ लंडनमध्ये घालवणार सुटी)

साहिल चौहानचा (Sahil Chauhan) स्ट्राईकरेट होता ३५१ धावांचा. त्याच्या या फटकेबाजीमुळे सायप्रसने समोर ठेवलेलं १९२ धावांचं आव्हान १० षटकांच्या आतच पार केलं. साहिलने या खेळीदरम्यान एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला. या आधी अफगाणिस्तानचा हझरतुल्ला झझाई आणि न्यूझीलंडचा फिन ॲलन यांच्या नावावर हा विक्रम होता. दोघांनी प्रत्येकी १६ षटकार खेचले होते. ३२ वर्षीय साहिलने १४४ पैकी १०६ धावा तर फक्त षटकारांनीच पूर्ण केल्या. (Fastest T20 Hundred)

(हेही वाचा – लष्कर आणि हवाई दलाच्या ताफ्यात Light Combat Helicopters दाखल होणार)

इस्टोनिया आणि सायप्रस हे संघ सध्या ६ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहेत. आणि पहिल्या सामन्यात साहिल चौहान (Sahil Chauhan) चक्क पहिल्याच चेंडूवर शून्यात बाद झाला होता. पण, त्याचा वचपा त्याने दुसऱ्या सामन्यात काढला. इस्टोनिया संघ आता मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. इस्टोनियाचं आयसीसी रँकिंग ७१ आहे. सायप्रसचं रँकिंग ६८ आहे. (Fastest T20 Hundred)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.