‘द काश्मीर फाईल्स’चे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे आता ‘द दिल्ली फाईल्स’ (The Delhi Files) हा चित्रपट घेऊन पुन्हा येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी कास्टिंग अलर्ट (Casting alert) प्रसारित केला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी X वर (ट्विटरवर) याविषयी पोस्ट केली आहे. यामध्ये चित्रपटातील मोहनदास गांधी आणि महंमद जिना यांच्या भूमिकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – India Nuclear Power : भारताने अणूबाँबच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानला टाकले मागे)
या भूमिकांसाठी इच्छूक कलाकारांनी कुठे आणि कसा संपर्क साधावा ?
१. आवश्यक ती वेशभूषा करून मोहनदास गांधी आणि महंमद अली जिना यांची ऐतिहासिक भाषणे करतांनाचा ६० सेकंदांचा व्हिडिओ बनवावा.
२. हा व्हिडिओ [email protected] या ईमेल पत्त्यावर १ जुलै २०२४ पर्यंत पाठवावा.
३. अधिक माहितीसाठी www.IAmBuddha.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
असे आवाहन करण्यात आले आहे.
CASTING ALERT:
Looking for Mohandas Karamchand Gandhi and Mohammad Ali Jinnah for #TheDelhiFiles.
Details👇 pic.twitter.com/XWbKMNDILs
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) June 18, 2024
अनटोल्ड स्टोरीज मालिकेतील तिसरा चित्रपट
बॉलीवूड चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ हा विवेक अग्निहोत्री यांच्या अनटोल्ड स्टोरीज मालिकेतील तिसरा चित्रपट असेल. या चित्रपटाची घोषणा त्यांनी 13 सप्टेंबर 2021 रोजी केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. अभिषेक अग्रवाल आर्ट्स ही अभिषेक अग्रवाल, अर्चना अग्रवाल, विवेक रंजन अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची निर्मिती संस्था आहे. या चित्रपटात पल्लवी जोशीदेखील काम करत आहेत.
या मालिकेतील विवेक अग्निहोत्री यांचा पहिला चित्रपट ‘द ताश्कंद फाइल्स’ (The Tashkent Files) होता. तो लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उकलणारा आणि सत्याच्या अधिकारावर आधारित होता. काश्मिरी हिंदूंच्या न्याय्य हक्कांवर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा त्यांचा दुसरा चित्रपट होता आणि आता त्यांचा तिसरा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ असेल. तो ‘राईट टू लाई’ वर आधारित आहे.
हा चित्रपट कशावर आधारित आहे?
‘द दिल्ली फाइल्स’ (The Delhi Files) हा चित्रपट 1984च्या शीखविरोधी दंगलीवर आधारित आहे. 1984 हे वर्ष भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. पंजाबमध्ये दहशतवादाची परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली गेली, ती अमानवी होती. हे केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी करण्यात आले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community