Motorola Edge 50 Ultra : लाकडी फिनिशिंगचं आवरण असलेला मोटोरोलाचा आधुनिक फोन

Motorola Edge 50 Ultra : मोटोरोला एज ५० अल्ट्रा फोन १८ जूनपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. 

153
Motorola Edge 50 Ultra : लाकडी फिनिशिंगचं आवरण असलेला मोटोरोलाचा आधुनिक फोन
  • ऋजुता लुकतुके

मोटोरोला कंपनीने (Motorola company) अलीकडच्या काळात एज सीरिजमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत. आणि आधुनिक फिचरबरोबरच लुकही नवीन असावा असा कंपनीचा आग्रह आहे. कंपनीचा यापूर्वी बाजारात आलेला फोन मोटोरोला एज ५० प्रो तरुणांमध्ये लोकप्रिय आहेच. पूर्वीच्या एज ३० आणि एज ४० या सीरिजनाही ग्राहकांनी उचलून धरलं होतं. आता या फोनच्या जोडीला मोटोरोला एज ५० अल्ट्रा हा फोन कंपनीने बाजारात आणला आहे. १८ जूनपासून ऑनलाईन माध्यमात फ्लिपकार्टवर आणि इतर मोबाईल शोरुममध्ये हा फोन उपलब्ध होईल. (Motorola Edge 50 Ultra)

एज ५० प्रो ची चौकट ही सिलिकॉन व्हिगान लेदरची आणि ॲल्युमिनिअमची बनलेली होती. आता यावेळी कंपनीने लाकडी फिनिशिंग दिलं आहे. तेच या फोनचं पहिलं वैशिष्ट्य ठरावं. कारण, लाकडी फिनिशिंग असलेली ही पहिली चौकट असणार आहे. शिवाय फोनच्या मागच्या बाजूला आहेत तीन कॅमेरे आणि दोन एलईडी फ्लॅश लाईट. ही चौकटही आकर्षक अशीच आहे. या फोनला आयपी ६८ प्रमाणपत्र मिळालं आहे. याचा अर्थ हा फोन धूळ, पाणी आणि वातावरणातील इतर गोष्टींपासून सुरक्षित आहे. (Motorola Edge 50 Ultra)

(हेही वाचा – Spying for Pakistan : आयएसआयच्या हेरांनी कसा हॅक केला शास्त्रज्ञाचा लॅपटॉप)

फोनची किंमत इतक्या रुपयांपासून सुरू

या फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा आहे. Eआणि पोल्ड थ्री-डी कर्व्ह्ड डिस्प्ले ही फोनची खासियत आहे. तर स्क्रीनवर अगदी हुबेहूब रंग छटा दिसतात असं प्रमाणपत्र पँटॉन संस्थेनं दिलं आहे. अगदी मानवी त्वचेच्या वेगवेगळ्या छटाही इथं हुबेहूब दिसतात, असा कंपनीचा दावा आहे. १.५ के सुपर एचडी रिझ्युलेशनमुळे डिस्प्ले अगदी सुस्पष्ट आहे. १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंगही वेगवान आहे. (Motorola Edge 50 Ultra)

अल्ट्रा फोनचं आणखी एक वेगळेपण म्हणजे मोटोरोला एआयचा प्रभावी वापर. फोनमध्ये मुख्य कॅमेरात १०० एक्स झूम लेन्स आहे. त्याचबरोबर मोटोरोला एआयच्या वापराने तुम्ही चांगला पोर्ट्रेट फोटो अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने काढू शकणार आहात. कारण, सेटिंग तुमचा फोनच तुमच्यासाठी करणार आहे. (Motorola Edge 50 Ultra)

एसजीएस आय प्रोटेक्शन तंत्रज्ञानामुळे अतीवापरानंतरही डोळ्यांना त्या मानाने थकवा जाणवत नाही. अँड्रॉईड १४ या प्रणालीवर हा फोन चालतो. आधीच्या ४० आणि ३० एज फोनमध्ये असलेला मीडियाटेक हा प्रोसेसर वापरणं कंपनीने एज ५० प्रो पासून बंद केलंय. आता कंपनी स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन ३ चिपसेट वापरतेय. फोनमधील कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. फोन ८ आणि १२ रॅम तसंच १२६ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत ४०,००० रुपयांपासून सुरू होते. (Motorola Edge 50 Ultra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.