Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विक्रम स्थापित होणार; पुढच्या महिन्यात सादर करणार सातवा अर्थसंकल्प

131
Finance Ministry : फक्त अर्थ मंत्रालयात 11 लाख पदे रिक्त
Finance Ministry : फक्त अर्थ मंत्रालयात 11 लाख पदे रिक्त

पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये नरेंद्र मोदी सरकार आपल्या तिसन्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामुळे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. त्यांनी आतापर्यंत लागोपाठ ५ वेळा तर एकदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यापूर्वी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी लागोपाठ सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, सीतारामन (Nirmala Sitharaman) जुलैत अर्थसंकल्प सादर करणार असल्यामुळे मोरारजींचा तो विक्रम मोडीत निघणार आहे.

एकूण १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अद्यापही मोरारजी यांच्याच नावावर आहे. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या आहेत. ५ जुलै २०१९ रोजी त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तर १ फेब्रुवारी २०२४ रोजी अखेरचा अर्थसंकल्प मांडला होता. हा त्यांचा सहावा अर्थसंकल्प होता.

(हेही वाचा – Motorola Edge 50 Ultra : लाकडी फिनिशिंगचं आवरण असलेला मोटोरोलाचा आधुनिक फोन)

सीतारामन यांची वैशिष्ट्ये
  • इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या
  • इंदिरा गांधींनंतर संरक्षण मंत्रिपद सांभाळणाऱ्या दुसऱ्या महिला
  • १९८४ मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डीग्री

२००३ ते २००५ राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.