- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जाँटी ऱ्होड्स (Jonty Rhodes) भारतीय संघाचा पुढील क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक होऊ शकतो. रेव्हस्पोर्ट्स या वेबसाईटने तशी बातमी दिली आहे. मधल्या फळीतील दर्जेदार फलंदाज असलेला ऱ्होड्स खऱ्या अर्थाने नावारुपाला आला तो त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी. चपळाईने खेळाडूंना धावचीत करणं आणि अशक्य वाटणारे झेल घेणं ही त्याची खासियत होती. त्याने फलंदाजीत २० धावा केल्या तर क्षेत्ररक्षणात तो २०-३० धावा वाचवत असे. आताही जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये त्याची गणना होते. (India’s Fielding Coach)
आता रेव्हस्पोर्ट्नी दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या वर्तुळात ऱ्होड्सचं नाव घेतलं जात आहे. पण, त्याला अधिकृतपणे अजून तरी विचारणा झालेली नाही. सध्या राहुल द्रविड यांच्यानंतर मुख्य प्रशिक्षक कोण होणार यावर बीसीसीआयमध्ये खल सुरू आहे. टी-२० विश्वचषकानंतर लगेचच द्रविड यांचा कार्यकाळ संपतो आहे. त्यामुळे आधी द्रविडचा वारसदार ठरवणं हे बीसीसीआयसमोरचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि त्यानंतर त्याचा सपोर्ट स्टाफ मुख्य प्रशिक्षकाच्या संमतीनेच निवडण्यात येईल. (India’s Fielding Coach)
(हेही वाचा – Uddhav Thackeray हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करणार?)
बीसीसीआयने मान्य केली ‘ही’ अट
सध्या प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर हे नाव आघाडीवर आहे. मीडियामध्ये यापूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, जाँटी ऱ्होड्सने (Jonty Rhodes) २०१९ मध्ये याच पदासाठी अर्ज केला होता. पण, त्यावेळचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तेव्हाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी श्रीधर यांना कायम ठेवलं होतं. गोलंदाजीची प्रशिक्षक म्हणून भरत अरुण यांनाही शास्त्री यांनी कायम ठेवलं होतं. (India’s Fielding Coach)
गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदाच्या चर्चा करताना एक अट ठेवली होती. त्यात आपल्या मर्जीचा सपोर्ट स्टाफ नेमणं ही एक अटही होती. बीसीसीआयने ती मान्य केल्याचं दैनिक भास्कर वृत्तपत्राने अलीकडेच आपल्या बातमीत म्हटलं होतं. गंभीर प्रशिक्षक पदावर आला तर त्याला अख्खा सपोर्ट स्टाफ बदलण्याची इच्छा आहे. भारतीय संघातही काही बदल होऊ शकतात. कारण, गंभीर प्रत्येक प्रकारासाठी वेगळे खेळाडू निवडण्याच्या मताचा आहे. (India’s Fielding Coach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community