शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे बांधकाम जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातील स्मारकाचे काम पाहण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Uddhav Thackeray)
एमएमआरडीएच्या माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या संदर्भात माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले, स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर खरे काम सुरु होणार आहे, ज्यामध्ये बाळासाहेबांच्या आयुष्याची माहिती देणारे इंटरिअरचे काम असणार आहे. त्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण जीवनप्रवास देण्यात येणार आहे. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – International yoga day: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्त तपासणी शिबिर)
२३ जानेवारी २०२५ पर्यंत हे स्मारक जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी लोकार्पण करता येईल, असा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात जनतेकडे जी कोणतीही माहिती, बाळासाहेबांचे फोटो, लेख, बातम्या किंवा इतर माहिती असेल ती त्यांनी शिवसेना भवन किंवा स्मारकावर आणून द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community