शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर मूळ शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर ठाम असून उद्धव ठाकरे यांची उबाठा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुस्लिमांच्या दाढ्या कुरवळायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांच्या जोरावर ९ खासदार निवडून आलेल्या उबाठा शिवसेनेचा कल आता मुस्लिमांकडे अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे बकरी ईदच्या निमित्ताने देवनार पशुवधगृहातील देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी पदाधिकाऱ्यांसह केला. त्यामुळे आजवर कधीही देवनार पशुवधगृहात न जाणाऱ्या शिवसेनेने बकरी ईद निमित्त आवर्जुन हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. (Anil Desai)
आशिया खंडातील सर्वात मोठे असलेल्या देवनार पशुवधगृह अर्थात देवनार कत्तलखान्यात ईद सणानिमित्त देशभरातून बकरी आणि शेळ्या विक्रीला आणले जातात. या सणानिमित्त महापालिकेच्यावतीने बकरीची विक्री करता येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी विविध प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या सुविधेची माहिती दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उबाठाचे खासदार अनिल देसाई यांनी पाहणी दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. या प्रसंगी उबाठा शिवसेनेचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभा संघटक निमिष भोसले, म्हात्रे, प्रविण महाले, दिनेश बोभाटे, उपविभागप्रमुख विजय साळवी, शाखाप्रमुख संदीप वेताळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Anil Desai)
(हेही वाचा – RTE प्रवेश आणखी लांबणीवर; आता पुढील सुनावणी जुलै महिन्यात)
आम्ही आपल्यासाठी कायम उपलब्ध…
देवनार कत्तलखान्यामध्ये ईद निमित्त महापालिकेच्यावतीने सेवा सुविधा पुरवल्या जात असून महापालिकेत सत्ता असूनही तत्कालिन महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि बाजार समिती अध्यक्ष हे याठिकाणी भेट दिली नव्हती. मुस्लिम समाजाच्या सणाबाबत कायम दुर्लक्ष करत असल्याने समाजवादी पक्षाच्यावतीने कायमच पाठपुरावा करून त्याठिकाणी कोणतीही गैरसोय राहू नये यासाठी प्रयत्न केला जात होता. परंतु जो उबाठा शिवसेना पक्ष मुस्लिम समाजाच्या सणाकडे विशेष लक्ष देत नव्हता, तोच पक्ष आता फुटल्यानंतर अंगावर हिरवी शाल पांघरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या समाजाची काळजी घेताना दिसत आहे. (Anil Desai)
उबाठा शिवसेनेचे नव्याने निवडून आलेले खासदार अनिल देसाई यांनी देवनार कत्तलखान्यात प्रथम का होईना पाय लावून तिथे महापालिकेने पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा आढावा घेत आता तुम्हाला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांची गरज नाही आम्ही आपल्यासाठी कायम उपलब्ध असल्याचे दाखवून दिले. ज्या मुस्लिम मतांच्या जोरावर अनिल देसाई हे निवडून आले आहेत, त्यांना आता त्यांच्यासाठी काम करावेच लागेल आणि उबाठा शिवसेनेने आता मुस्लिमांचा कैवार सुरु केला आणि आपल्या कामाची सुरुवात देसाई यांनी मुस्लिमांपासून सुरु केल्याने हे स्पष्ट होते, असे नागरिकांकडूनच बोलले जात आहे. (Anil Desai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community