मुंबईत अनधिकृत कत्तलीसाठी आणलेल्या शेळ्या आणि मेंढ्या महापालिकेच्या बाजार विभागाच्यावतीने ताब्यात घेतल्या जात असून पकडलेल्या शेळ्या व मेंढ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रत्येक परिमंडळांमध्ये रेड व्हॅनची सुविधा पुरवली जाते. या शेळ्या मेंढ्या पकडण्यासाठीच मागील तीन वर्षांमध्ये तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. (Market Department)
मुंबई परिसरात अनधिकृत कत्तलीसाठी आणलेल्या शेळ्या आणि मेंढ्यांची विल्हेवाट महापालिकेच्या बाजार विभागाच्यावतीने लावली जाते. ही विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने सात परिमंडळांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. (Market Department)
(हेही वाचा – Marine Drive : क्वीन नेकलेस आता मुंबईकरांना न्याहाळता येणार; १.०७ किलोमीटरचा पदपथ वापरासाठी पूर्ववत)
यासाठी सन २०१९ मध्ये ही वाहने पुरवण्यासाठी महापालिकेच्यावतीने संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्यक्षात मार्च २०२० रोजी याचा कार्यादेश देण्यात आला असून प्रत्यक्षात कोविड काळात हे काम सुरु न झाल्याने आता डिसेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीत शेळ्या आणि मेंढ्या पकडून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तब्बल १ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. (Market Department)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community