BMC मुख्यालय आणि मुंबईतील 50 रुग्णालये बॉम्बने उडवण्याची धमकी

ईमेल पाठवणाऱ्याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडवण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील बीएमसी (BMC) मुख्यालयालाही धमकीचा ईमेल आला आहे.

336
Election Duty : निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना १५ लाख रुपये

मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना धमकीचा मेल आला आहे. मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल (Bomb Threat) पाठवण्यात आला आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये (mumbai hospital bomb threat) धमकीचे ईमेल आले आहेत. ईमेल पाठवणाऱ्याने रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडवण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील बीएमसी (BMC) मुख्यालयालाही धमकीचा ईमेल आला. ईमेलद्वारे मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली.

(हेही वाचा – पंतप्रधान ३० जून पासून पुन्हा करणार Man Ki Baat)

मुंबईतील रुग्णालये बॉम्बने उडवण्याची धमकी

धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून सर्व ईमेल पाठवले आहेत. हा ईमेल मुंबईतील जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलमध्ये आल्याचीही माहिती आहे. एकाच ईमेलमध्ये लिहिलेला हा धमकीचा ईमेल 50 हून अधिक रुग्णालयांना पाठवण्यात आला आहे. रुग्णालयांना धमकीचा ईमेल मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

पोलिसांकडून तपास सुरु

मुंबई पोलिसांना (mumbai police) प्राथमिक तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना हा धमकीचा ईमेल आला आहे आणि धमकीचा ईमेल बीबल डॉट कॉम नावाच्या वेबसाइटचा वापर करून पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, धमकीचा ईमेल पाठवणारी व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. धमकीचा ईमेल पाठवण्यामागचा हेतू काय होता, याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

पोलिसांनी बीएमसीच्या मुख्यालयात तपास केला पण त्यात काहीही संशयास्पद आढळलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महाविद्यालयांनाही धमकी

मुंबईतील महाविद्यालयांनाही धमकीचे ईमेल आले आहेत. मुंबईच्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये धमकीचा ईमेल आला आहे. ईमेल करणाऱ्याने कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, कॉलेज प्रशासनाने जवळच्या पोलिस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी आले आणि त्यांनी तपास केला; पण काहीही संशयास्पद आढळलं नाही. व्हीपी रोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.