महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी मंदिराची (Tuljabhavani Temple) पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला असून नवीन गाभारा उभारला जाणार आहे. यासाठी सोने आणि चांदीचा उपयोग केला जाणार आहे. सिंहासनालाही सोने आणि चांदीचा मुलामा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पुरातत्त्व विभागाचे मार्गदर्शन आणि सल्ल्यानुसार हे बदल केले जातील.
पुरातत्त्व विभागाच्या मदतीने तुळजाभवानी मंदिरातील (Tuljabhavani Temple) जुन्या बांधकामाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी तडे गेलेले दगडी खांब काढून नवीन खांब बसवण्यात येतील, मात्र मंदिराचा मूळ पोत बिघडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी ५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
(हेही वाचा – Indian Judicial Code : १ जुलैपासून ‘भारतीय न्याय संहिता’ कायदा लागू; आता ‘चारसो बीसी’ चालणार नाही )
तडे गेलेले खांब बदलले जाणार…
तुळजाभवानी मंदिर परिसरात बाह्य सुविधा सक्षमतेने निर्माण करण्यात येत आहेत, मात्र आंतरिक सुविधा उभारणीत अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने आता मंदिराची पुनर्बांधणी अर्थात जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सांगितले की, यामध्ये मंदिराच्या मुख्य मंडपाचे खांब बदलण्यात येणार आहेत. या दगडी खांबांना अनेक वर्षांपासून तडे गेले आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने तडे गेलेले खांब बदलेले जातील.
नवीन बदल कोणते होतील?
जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सांगितले की, मंदिराची रचना खूप वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यामुळे मंदिराच्या बाहेर पडण्यासाठीसुद्धा योग्य मार्ग नाहीत तसेच मंदिरात येण्यासाठीसुद्धा मुख्य प्रवेशद्वारातूनच पारंपरिक पद्धतीने प्रवेश देण्याची मागणी होत आहे. या मुद्द्याला अनुसरून मंदिरातून बाहेर पडण्यासाठी मार्गाची रचना तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून दर्शन रांगेचा वेग वाढू शकेल. काही महिलांची उंची कमी असल्यामुळे मुख दर्शन होत नाही, यासाठीही उपाययोजना केली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community