T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर….

T20 World Cup, Ind vs Afg : साखळी सामन्यांदरम्यान अमेरिकेत जोरदार पाऊस झाला होता 

183
T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर….
T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर….
  • ऋजुता लुकतुके

टी20 विश्वचषकातील (T20 World Cup, Ind vs Afg) साखळी फेरीतील सामने संपले आहेत. आता सुपर ८ चा थरार रंगणार आहे. २० संघापैकी ८ संघ सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत. भारतीय संघासोबत अफगाणिस्तान, बांगलादेश (Bangladesh) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे संघ अ ग्रुपमध्ये आहेत. सुपर ८ मधील भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानसोबत २० जून रोजी होणार आहे. पण या सामन्यात पावसाने खोडा घातला तर काय? असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडला असेल. कारण, साखळी फेरीमध्ये काही सामने पावसामुळे प्रभावित झाले होते. आता सुपर ८ मध्ये पावसाने खोळंबा घातला तर काय होणार?  (T20 World Cup, Ind vs Afg)

भारताचा अफगाणिस्तान विरुद्धचा सामना ब्रिजटाउनमधील केनसिंगटन ओव्हल मैदानात पार पडणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ब्रिजटाउनमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पावसामुळे भारत आणि अफगाणिस्तान हा सामना रद्द झाला तर काय होणार ? (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Indian Army: जवानांसाठी ‘स्कीन बँक’ सुरू करण्याचा निर्णय, देशातील पहिलाच उपक्रम; लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले…)

किमान प्रत्येकी ५ षटकांचा सामना झाला तरी तो खेळवण्याचा आयोजकांचा प्रयत्न असेल. अगदी अंतिम फेरीपर्यंत आयसीसीने ही भूमिका ठेवली आहे. बाकी सुपर ८ ही स्पर्धेची दुसरी फेरी असली तरी ती नॉक-आऊट किंवा बाद फेरी नाही. (T20 World Cup, Ind vs Afg)

सुपर ८ साठी दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी चार चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ ग्रुपमधील इतर तीन संघासोबत भिडणार आहे. दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे दोन संघ उपान्य फेरीसाठी पात्र ठरतील. उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर… अ ग्रुपमधून भारताने तिन्ही सामने जिंकल्यास भारतीय संघ पुढेचाल करेल. तर दोन सामने जिंकणारा अथवा जास्त गुण असणारा दुसरा संघही उपान्त्य फेरीत पोहचेल. याचप्रमाणे ब गटातही होईल. म्हणजे, अ आणि ब गटातील आघाडीचे दोन दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Afg : टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मध्ये भारताची रणनीती काय असेल? कुलदीपला संधी मिळेल का?)

२० जून रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक अंक दिला जाईल. हा एक गुण दोन्ही संघासाठी फायद्याचा ठरु शकतो अन् धोक्याचाही ठरु शकतो. (T20 World Cup, Ind vs Afg)

उदाहरण म्हणून पाहूयात, इंग्लंडचा स्कॉटलंड सोबतचा ग्रुप स्टेजमधील सामना रद्द करण्यात आला होता, त्यानंतर सुपर-8 साठी पात्र होणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले होते. स्पष्ट शब्दात समजून घ्यायचे झाले तर भारत-अफगाणिस्तान सामन्यातून कोणताही संघ पावसामुळे बाहेर पडणार नाही, कारण हा बाद फेरीचा टप्पा नाही. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- नागपुरातील Ambazari Bridge पाडल्याने ‘या’ परिसरात मोठी वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल)

भारताचे सुपर ८ मधील सामने कसे असतील – 

20 जून – भारत विरुद्ध अफगाणिस्तान

22 जून – भारत विरुद्ध बांगलादेश

24 जून – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.