Amazon Package : Amazon वरून सामान मागवलं, पॅकेट उघडताच समोर कोब्रा! पहा व्हिडीओ

345
Amazon Package : Amazon वरून सामान मागवलं, पॅकेट उघडताच समोर कोब्रा! पहा व्हिडीओ
Amazon Package : Amazon वरून सामान मागवलं, पॅकेट उघडताच समोर कोब्रा! पहा व्हिडीओ

बंगळुरूमधील (Bangalore) एक जोडप्याने ॲमेझॉनवरून (Amazon Package) ऑनलाइन सामान मागवलं. ॲमेझॉनवरून त्यांनी काही वस्तू ऑर्डर केल्या, पण डिलीव्हरी झाल्यावर जेव्हा त्यांनी सामानाचा बॉक्स उघडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनचं सरकली. तो बॉक्स उघडताच त्यांच्यासमरो एक कोब्रा (साप) फुत्कार टाकताना दिसला, ते पाहून जोडपं घाबरुन गेलं. (Amazon Package)

ॲमेझॉनवरून (Amazon Package) आलेल्या सामानात साप असल्याचा दावा त्या जोडप्याने केला असून त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. तो साप त्या बॉक्सच्या टेपला (चिकटपट्टी) चिकटला होता, त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. अन्यथा तो मोकळा असता तर कोणाला चावूही शकला असता. या घटनेचा व्हिडीओ शूट करून त्या जोडप्याने तो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र या घटनेमुळे ई-कॉमर्स कंपन्यांचे पॅकेजिंक आणि डिलीव्हरी प्रक्रियेवरून नवा वाद सुरू झाला आहे. (Amazon Package)

(हेही वाचा –279 IPC : काय आहे आयपीसी कलम २७९? या कलमाचा कोणत्या गुन्ह्यासाठी वापर केला जातो?)

या जोडप्याच्या सांगण्यानुसार, त्यांनी दोन दिवसांपूर्वी ॲमेझॉनवरून एक्सबॉक्स कंट्रोलर ऑर्डर केला होता, परंतु त्यांनी पॅकेट उघडण्याचा प्रयत्न करताच आतमध्ये जिवंत साप पाहून त्यांना धक्काच बसला. सर्जापूर रोड येथील रहिवासी असलेल्या या जोडप्याने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केल्याचे नमूद केले. तेथे एक एक प्रत्यक्षदर्शीही आहे. सुदैवाने साप पॅकेजिंग टॅपमध्ये अडकला, अन्यथा आमच्या घरातील किंवा अपार्टमेंटमधील इतर लोकांना त्रास होऊ शकला असता. एवढ्या मोठ्या निष्काळजीपणानंतरही ॲमेझॉन त्यांचे ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कस्टमर केअरच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना दोन तास फोनवर अडकवून ठेवले. मग तुम्ही स्वतःच ही परिस्थिती हातळा असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्या जोडप्याला नाहक त्रासाचा सामना करावा लगल्याचं त्यांचं म्हणणं आहे. (Amazon Package)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.