T20 World Cup, Ind vs Afg : सूर्यकुमार यादवच्या हाताला झालेली दुखापत किती गंभीर?

T20 World Cup, Ind vs Afg : वेस्ट इंडिजमध्ये पहिला सराव करताना चेंडू सुर्यकुमारच्या हातावर बसला

123
T20 World Cup, Ind vs Afg :सूर्यकुमार यादवच्या हाताला झालेली दुखापत किती गंभीर?
T20 World Cup, Ind vs Afg : सूर्यकुमार यादवच्या हाताला झालेली दुखापत किती गंभीर?
  • ऋजुता लुकतुके

भारताने टी २० विश्वचषक (T20 World Cup, Ind vs Afg) स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांची टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ मध्ये लढत २० जूनला होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. बारबाडोसमध्ये नेटमध्ये फलंदाजी करताना आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव जखमी झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) हाताला दुखापत झाली आहे. मात्र, फिजिओच्या सल्ल्यानंतर देखील सूर्यकुमार यादवनं फलंदाजी सुरु ठेवली. सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) दुखापत झालेल्या ठिकाणी मॅजिक स्प्रे मारुन फलंदाजी सुरु ठेवली. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) झालेली दुखापत किती गंभीर आहे. यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. (T20 World Cup, Ind vs Afg)

सूर्यकुमार यादव टी २० वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup, Ind vs Afg) भारताचा महत्त्वाचा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादव आयसीसी टी २०  रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) अमेरिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळं सुपर ८ मधून सेमीफायनलमध्ये जायचं असल्यास सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं सूर्यकुमार यादवला झालेली दुखापत अधिक गंभीर असू नये, अशी अपेक्षा भारताचे चाहते करत आहेत. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Amazon Package : Amazon वरून सामान मागवलं, पॅकेट उघडताच समोर कोब्रा! पहा व्हिडीओ)

भारतानं सोमवारी सकाळी सराव सत्रात सहभाग घेतला. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहलीसर सर्व खेळाडू सहभागी झाले होते. बारबाडोसमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न भारताच्या खेळाडूंनी केला. (T20 World Cup, Ind vs Afg)

भारत आणि कॅनडा यांच्यातील अखेरची लढत पावसामुळं वाया गेली. आयसीसीला पावसामुळं ती मॅच रद्द करावी लागली. भारतानं ग्रुप स्टेजमधील तीन विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताची पहिली मॅच अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. २० जूनला भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने येतील. (T20 World Cup, Ind vs Afg)

(हेही वाचा- Electricity Theft : दादरमध्ये खुलेआम वीज चोरी, बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलाय का फेरीवाल्यांना मोफत वीज वापराचा परवाना?)

भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी २० वर्ल्ड कपमध्ये भारतानं विजेतेपद मिळवलं होतं. यानंतर पुढच्या सात टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. याशिवाय गेल्या १० वर्षांपासून भारताला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलेलं नाही. सुपर ८ मधील दोन मॅच जिंकल्यानंतर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळं भारत यावेळी टी २० वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. (T20 World Cup, Ind vs Afg)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.