- ऋजुता लुकतुके
ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन (World Champion) भालाफेकपटू नीरज चोप्राने (Paavo Nurmi Games) पावो नूरमी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ८५.९७ मीटर भालाफेक केली, जी त्याची आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम फेक ठरली. सुवर्ण जिंकून नीरजने पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी (Paris Olympics) फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत. फिनलंडच्या टोनी केरानेनने (84.19 मीटर) दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक पटकावले. (Paavo Nurmi Games )
Neeraj Chopra strikes gold again!
With a stunning throw of 85.97m, he clinches victory at the Paavo Nurmi Games 2024 in Finland.
Congratulations Champ✌️ pic.twitter.com/Fnq34bZRxV
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 18, 2024
पावो नूरमी गेम्स लीगमध्ये नीरज चोप्राची कामगिरी
पहिला प्रयत्न – ८३.६२ मीटर
दुसरा प्रयत्न – ८३.४५ मीटर
तिसरा प्रयत्न – ८५.९७ मीटर
चौथा प्रयत्न – ८२.२१ मीटर
पाचवा प्रयत्न – फाऊल
सहावा प्रयत्न – ८२.९२ मीटर
(हेही वाचा- महाराष्ट्रात भाजपाला देवेंद्र यांचेच नेतृत्व Chandrashekhar Bawankule याची माहिती)
नीरज पुन्हा ९० मीटरचा अडथळा पार करू शकला नाही?
नीरजने (Paavo Nurmi Games) याच स्पर्धेत २०२२ मध्ये ८९.३० मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले होते. ही त्याची ऑलिम्पिकनंतरची सर्वोत्तम वैयक्तिक फेक होती. त्याने याच वर्षी डायमंड लीगच्या स्टॉकहोम टप्प्यात ८९.९४ मीटर भालाफेक करून यात सुधारणा केली. तेव्हापासून नीरजने ९० मीटर भालाफेकीचं लक्ष्य ठेवलं आहे. पण, मागच्या वर्षभरात तो ९० मीटर सर करू शकलेला नाही. दोन वेळचा विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि २०१२ चा ऑलिम्पिक चॅम्पियन त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशोर्न वॉल्कोट यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. मांडीचे स्नायू दुखत असल्याने नीरज चोप्राने गेल्या महिन्यात ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेतून माघार घेतली होती. दोहा डायमंड लीगने सीझनची सुरुवात करणाऱ्या चोप्रा आता पॅरिस डायमंड लीगमध्ये ७ जुलैला सहभागी होणार आहेत. (Paavo Nurmi Games)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community