गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांचे सुरू केलेले लांगूलचालन व्यर्थ गेले. शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी शिवसेना उबाठाची दारे बंद असल्याचे बुधवारी १९ जूनला बोलताना स्पष्ट केले. राऊत यांनी इतर करणे सांगितली असली तरी भुजबळांना उबाठा प्रवेशबंदीचे खरे कारण म्हणजे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एकेकाळी केलेली अटक हेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Shiv Sena UBT)
‘भुजबळांची वाट आम्हाला दिसली नाही’
राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांच्यासाठी पक्षाची दारे बंद असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “कालपासून जोरात अफवा चाललेलल्या आहेत की भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ही कोणती वाट आहे ती आम्हाला दिसली नाही कधी. ते एकेकाळी शिवसेनेमध्ये होते, त्यानंतर काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता सध्याचे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, असा त्यांचा मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता राजकीय प्रवासात खूप पुढे गेली आहे,” असे राऊत म्हणाले. (Shiv Sena UBT)
(हेही वाचा – Vasai Murder Case: “पैसे दे, मामला रफादफा करतो”, वसई पोलिसांनी मागितले आरोपीकडे पैसे, आरतीच्या बहिणीचा पोलिसांवर गंभीर आरोप)
भुजबळ आणि शिवसेना उबाठाची भूमिका वेगळी
“छगन भुजबळ त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेची भूमिका मेळ खाणार नाही. त्यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, चर्चा झालेली नाही आणि होणार नाही,” असेही राऊत यांनी स्पष्टच सांगून खरे कारण गुलदस्त्यात ठेवले. “शिवसेना उबाठाची भूमिका स्पष्ट करताना राऊत पुढे म्हणाले, “अडीच वर्षापासून ज्यांनी शिवसेनेशी उभा दावा मांडला, शिवसेना फोडली, महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हातमिळवणी केली, त्यांच्याशी आमचा आता कोणताही प्रकारचा संवाद राहिलेला नाही, राहणार नाही,” असे आणखी एक कारण त्यांनी पुढे केले मात्र बाळासाहेबांना अटक केल्याचा उल्लेख टाळला. (Shiv Sena UBT)
बाळासाहेबांना अटक
१९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या दंगली दरम्यान ‘सामना’मध्ये छापून आलेल्या एका अग्रलेखातून धार्मिक भावना भडकवल्या गेल्या आणि कायदा-सुव्यवस्था बिघडली, असा आरोप करत बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. पुढे १९९५ ते १९९९ शिवसेना-भाजपा सत्तेवर आले आणि कारवाई टळली. पुढे २००० मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर या प्रकरणी २५ जून २००० रोजी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महत्वाची भूमिका बजावली असा आरोप होतो. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community