Lok Sabha Election: ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका; भाजप नेत्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र!

201
Lok Sabha Election: ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका; भाजप नेत्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र!
Lok Sabha Election: ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका; भाजप नेत्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपाला (BJP) म्हणावे तशा जागा निवडून आल्या नाही. परंतु मोदी सरकार पुन्हा तिसऱ्यांदा स्थापन झाले. मतदानाची कमी झालेल्या टक्केवारीवरुन मुंबईतील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहिले आहे. तसेच तुम्ही गेल्या दहा वर्षांपासून राबवत असलेल्या मोफत धान्य योजना बंद करावी, अशी थेट मागणीच त्यांनी केली. तसेच ही योजना थेट बंद न करता ज्यांनी मतदान केले, त्यांनाच मोफत धान्य दिले जावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. (Lok Sabha Election)

ज्यांनी मतदान केले, त्यांनाच मोफत धान्य दिले जावे

भाजप कार्यकर्त्याने पंतप्रधानांना लिहिलेले पत्र समोर आले असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अर्जुन गुप्ता (Arjun Gupta) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले. सदर पत्रात ते म्हणाले की, संपूर्ण देशात मोफत रेशन देणे बंद करावे, अन्यथा ज्यांनी मतदान केले आहे, त्यांनाच मोफत धान्य दिले जावे, अशी मागणी आहे. (Lok Sabha Election)

देशात अशाप्रकारचे मतदान होत असेल तर चिंतेचा विषय

अर्जुन गुप्ता पुढे म्हणाले की, गेल्या 60 वर्षात जे काँग्रेसला जमले नाही, ते तुम्ही गेल्या दहा वर्षांमध्ये करून दाखवले आहे. तुमच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल ही विश्वगुरूच्या दिशेने होत आहे. विकासाची गंगा सर्वत्र वाहत असताना देखील देशात अशाप्रकारचे मतदान होत असेल तर चिंतेचा विषय आहे. (Lok Sabha Election)

मोफत रेशन देण्यावर तात्काळ बंदी घालावी

गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. त्यात किती लोकांनी मतदान केले हा तपासाचा विषय आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी मतदान केले नाही, त्यांना मोफत रेशन देण्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी विनंती आहे. असं अर्जुन गुप्ता पत्रात म्हणाले आहेत. (Lok Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.