Assam: भूस्खलनात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू!

127
Assam: भूस्खलनात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू!
Assam: भूस्खलनात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू!

आसामच्या (Assam) करीमगंज (Karimganj) जिल्ह्यातील बदरपूर पोलीस ठाण्यांतर्गत एंगलरबाजार बेंदरगुल गावात मंगळवारी (18 जून) रात्री भूस्खलनात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. एंगलरबाजार बेंदरगुल गावातील अब्दुल करीम हे मंगळवारी आपल्या घरात झोपले होते. यावेळी मोठा आवाज ऐकून ते जागे झाले. भूस्खलनामुळे घर कोसळून त्यांची पत्नी आणि मुले त्यात दबली होती. (Assam)

(हेही वाचा –Kalyan News: डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी!)

या घटनेनंतर मशिदीच्या इमामने माईकवर घोषणा करून सर्वांना मदतीसाठी बोलावले. घटनेची माहिती मिळताच बदरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास आपत्तीग्रस्त गावात पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अब्दुल करीम यांची पत्नी, 3 मुली आणि मुलाचे मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. अब्दुल करीम हे या घटनेत बचावले, परंतु त्यांची पत्नी रायमुन नेसा (55), मुली साहिदा खानम (18), जाहिदा खानम (16), हमीदा खानम (11) आणि मुलगा मेहंदी हसन (3) यांचा मृत्यू झाला. (Assam)

(हेही वाचा –Shiv Sena UBT ची दारे छगन भुजबळ यांच्यासाठी बंद!)

अब्दुल यांच्या एका मुलीचा जीव वाचला आहे. मेहंदी हा अब्दुलचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासकीय दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत मृतदेह शवविच्छेदनासाठी करीमगंज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. बदरपूरचे परिमंडळ अधिकारी तसेच प्रशासकीय दंडाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. (Assam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.