Sea Turtles : कोकणात दीड लाखांहून अधिक सागरी कासवांचे संवर्धन

115
Sea Turtles : कोकणात दीड लाखांहून अधिक सागरी कासवांचे संवर्धन

कोकणात सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात २०२३-२४ या वर्षात आढळलेल्या २ हजार ५६६ घरट्यांमधील १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १७ किनाऱ्यांवरून ४८ हजार ४७४ पिल्ले सोडण्यात आली. पिल्लांची आणि घरट्यांची संख्या २०२२-२३ पेक्षा दुप्पट असून पिल्लांचा जन्म होण्याचा दरही ६४ टक्के आहे. (Sea Turtles)

कोकण किनाऱ्यावर ”ऑलिव्ह रिडले” प्रजातीच्या सागरी कासवांची घरटी आढळतात. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिल्लांचा जन्मदर रत्नागिरी आणि रायगडपेक्षा अधिक आहे. (Sea Turtles)

(हेही वाचा – Jammu and Kashmir च्या बारामुल्लामध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान जखमी)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा समुद्री कासवांची (Sea Turtles) १ हजार ६२२ घरटी आढळली. या घरट्यांमध्ये संवर्धित केलेल्या १ लाख ५२ हजार ५९३ अंड्यांमधून १ लाख ६ हजार ३८० पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पिल्लांचा जन्मदर यंदा ७० टक्के आहे. रत्नागिरीमध्ये तोच जन्मदर ५५ टक्के आणि रायगडमध्ये ६५ टक्के आहे. (Sea Turtles)

किनारपट्टीवर कासव संवर्धन करण्यासाठी वन विभागाकडून कासवमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. या कासवमित्रांकडून कासवांची अंडी शोधणे, त्यांचा सांभाळ करणे, घरट्यामधून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडणे अशी जबाबदारी असते. ती कासव मित्र अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने निभावतात त्यामुळे वन विभागाला मदत होते. (Sea Turtles)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.