Arvind Kejriwal यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत वाढ!

130
Arvind Kejriwal यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत वाढ!
Arvind Kejriwal यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत वाढ!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा दणका बसला आहे. दारू घोटाळा प्रकरणी न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी 19 जूनपर्यंत केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मतदानोत्तर जामीन कालावधी ६ जून रोजी संपल्यानंतर केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. (Arvind Kejriwal)

केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी सोडण्यात आले

निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांची निवडणूक प्रचारासाठी जामिनावर सुटका करण्यात आली होती. यानंतर जामीन अर्जावर सुनावणी करताना राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांचा अंतरिम जामीन 19 जूनपर्यंत वाढवला होता. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीनंतर केजरीवाल यांच्या जामीनात पुन्हा ३ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (Arvind Kejriwal)

अरविंद केजरीवाल यांचा युक्तिवाद निष्फळ ठरला

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आजाराबाबत न्यायालयासमोर अनेक युक्तिवाद केले होते, परंतु न्यायालयाने ते सर्व फेटाळले. आता 3 जुलैनंतर केजरीवाल पुन्हा कोर्टात हजर होतील, त्यानंतरच केजरीवाल तुरुंगात राहणार की बाहेर हे ठरवले जाईल. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.