Walbhat River : अतिक्रमण हटवून वालभट नदीचे रुंदीकरण; खासगी जमिनी ताब्यात घेत केले रुंदीकरण

1424
Walbhat River : अतिक्रमण हटवून वालभट नदीचे रुंदीकरण; खासगी जमिनी ताब्यात घेत केले रुंदीकरण

वालभट नदीचा (Walbhat River) अतिक्रमणाचा विळखा हटवून या नदीचे रुंदीकरण करण्यात आले असून या रुंदीकरणात खासगी जमिनींचा काही भाग महापालिकेने ताब्यात घेतला आहे. या नदीच्या रुंदीकरणात ताब्यात घेतलेल्या खासगी जमिनींसाठी तब्बल एक कोटींहून अधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून महापालिकेला मोजावी लागली आहे. (Walbhat River)

पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील नागरी निवारा टेकडीवरून उगम होणारी वालभट नदी या द्रुतगती महामार्गालगत कामा इंडस्टियल इस्टेट, शर्मा इस्टेट जवळून वाहत जावून पश्चिम रेल्वेला छेदून पुढे जवाहर नगर, तिवारी इस्टेट, राम मंदिर रोड येथून वाहत जात शेवटी आशिवरा नदीला जावून मिळते. या नदीच्या काही भागाचे बांधकाम बिनथरीचे दगडाचे असून काही भागांचे बांधकाम हे सिमेंट काँक्रिटचे केले आहे. (Walbhat River)

(हेही वाचा – Lok Sabha Election: ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मोफत धान्य देऊ नका; भाजप नेत्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र!)

या नदीची (Walbhat River) एकूण लांबी ही ७.२ कि.मी एवढी असून त्यापैंकी काही भागाचे ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि सल्लागारांनी केलेल्या शिफारस केल्यानुसार पश्चिम रेल्वेच्या वरच्या बाजुने २० मीटर आणि पश्चिम रेल्वेच्या खालच्या बाजुचे ३० ते ३९ मीटर एवढे रुंदीकरण करण्यात आलेले आहे. या नदीच्या पात्राभोवती ७८० मीटर लांब भागात अतिक्रमण झाल्याने या भागाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे या अतिक्रमण बाधित भूखंडाना महापालिकेने नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यातील काही भूखंड धारकांनी महापालिकेकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. (Walbhat River)

या नदीच्या रुंदीकरणाच्या बांधकामांमध्ये पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमित बांधकामाचे क्षेत्रफळ हे १३३ चौरस मीटर एवढे होते, परंतु त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार या अतिक्रमित भूखंडाच्या जागेचे क्षेत्रफळाचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यात या अतिक्रमित जागेचे क्षेत्रफळ हे १५८.४० चौरस मीटर एवढे दिसून आले. यातील बाधित भूखंडासाठी सुमारे दीड कोटी रुपये रुपयांचा खर्च अपेक्षित होता, त्यातील १ कोटी ०७ लाख १३ हजार रुपये एवढी नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. (Walbhat River)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.