शिवसेनेचा आज 58 वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसह, एकनाथ शिंदे यांच्यावर ही हल्लबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एनडीएसोबत जायचं का? असा प्रश्न विचारला. (Uddhav Thackeray)
“मी शून्य आहे”
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “गेल्या आठवड्यात मविआची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मी सर्वांना धन्यवाद दिले. पण मी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सर्व देशभक्त ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, दलित या सर्वांना, मविआला मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी धन्यवाद देतो. सलामीला भास्कर जाधव, मधल्या फळीत संजय राऊत यांनी भाषणं केली. आता शेवटचा बोलर फलंदाजीला आल्यावर काय परिस्थिती होते, तशी अवस्था माझी झाली आहे. मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात. आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा तुम्हालाला कोणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदींमध्ये आहे. आता पुन्हा एकदा चर्चा करतात उद्धव ठाकरे मोदींसोबत जाणार. ज्यांनी शिवसेना फोडली, मातेसमान शिवसेनेला फोडलं त्या नालायकांसोबत परत जायचं? आता त्यांची फाटलीये.” (Uddhav Thackeray)
(हेही वाचा –Sanjay Raut यांनी डोमकावळे म्हणत शिवसेनेला डिचवले)
“सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणं, यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणं हा शासकीय नक्षलवाद आहे. मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाणचिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभांसाठी मोदी तुम्ही सभा घ्या. या मिंदेला बाजूला ठेवा.” असं ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community