शिवसेना संपवायला निघाले पण शिवसेना काही संपवता आलेली नाही. शिवसेना आज ५८ वर्षांची झालेली असून त्यांच्या शिवसेनेला अडीच वर्षे झालेली आहेत. वरळीत डोमकावळ्यांचा मेळावा असून आता ते अडीच वर्षांपेक्षा जास्त टिकणार नाहीत, अशा शब्दांत उबाठा शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली. (Sanjay Raut)
शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद उबाठा शिवसेनेच्यावतीने बुधवार (१९ जून) मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा खुळखुळा केला असून ते शिवसेना संपवायला निघाले पण ते शिवसेना काही संपवू शकले नाहीत. शिवसेना आजही उभी आहे. कितीही रेडे आणा शिवसेना संपणार नाही. वरळीत जे जमले आहेत ते डोमकावळे आहेत, डोमकावळ्यांचे ते संमेलन आहे. आमचा पक्ष ५८ वर्षांचे झाला आहे. वेळ जात नव्हता म्हणून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही. महाराष्ट्र हा स्वाभिमान आणि अभिमानात उभा आहे. (Sanjay Raut)
नरेंद्र मोदी ब्रँड होता, आता ती ब्रँडी झाली – राऊत
असे कोणी गुजरातचे सोमेगोमे, हवशे गवशे आले तरी त्यांना शिवसेना संपवता आली नाही आणि त्यांनी हे स्वप्न पाहू नये. भाजपा आज आभार यात्रा काढते, धन्यवाद यात्रा काढणार म्हणे, कशाला पराभव केल्याबद्दल असा सवाल करत, मला कळतच नाही, धन्यवाद यात्रा कशाला ४०० ऐवजी २४० वर आले म्हणून. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. (Sanjay Raut)
नरेंद्र मोदी ब्रँड होता, आता ती ब्रँडी झाली आहे. ब्रॅंडीचे दोन घोट मारतात ते. तुम्ही हरलात, तुमचा पराभव झाला हे नाकारु शकत नाही. महाराष्ट्रामध्ये सट्टा लागलाय, सत्तेचा सट्टा लागलाय. यापुढे त्यांचा आकडा लागणार नाही, सट्टा बाजार आणि शेअर बाजार नेहमी कोसळतो, दिल्लीतही कोसळणार आणि महाराष्ट्रातही. जिथे मंदिर तिथे भाजपाचा पराभव झाला. अयोध्येत हरले, नाशिकला हरले, जिथे राम तिथे पराभव झाला. किती दिवस पैशांची मस्ती चालणार आहे. असा सवाल करत आता वारकऱ्यांना विकत घ्यायला निघाले असेही राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community