जबडा फ्रॅक्चर होऊनही खेळत राहिला; भारताचा माजी वेगवान गोलंदाज Ramakant Desai

181
जबडा फ्रॅक्चर होऊनही खेळत राहिला; भारताचा माजी वेगवान गोलंदाज Ramakant Desai

रमाकांत भिकाजी देसाई (Ramakant Desai) हे एक भारतीय क्रिकेटपटू होते. विशेष म्हणजे ते भारताचे वेगवान गोलंदाज होते आणि कसोटी सामने खेळायचे. त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांना क्रिकेट जगतात ’टायनी’ म्हणायचे. त्यांनी १९५८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि ४९ षटकात ४/१६९ असे बळी घेतले. (Ramakant Desai)

त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते उत्तम बाउंसर टाकायचे. १९६० मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्यांनी २१ बळी घेतले. मुंबईत झालेल्या सामन्यात त्यांनी १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेगवान ८५ धावा केल्या. हा त्याकाळचा मोठा विक्रम होता. १९६४ मध्ये मुंबई येथे न्यूझीलंडविरुद्ध एका सामन्यांत ५६ धावा देऊन त्यांनी ६ बळी घेतले. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. (Ramakant Desai)

(हेही वाचा – Sanjay Raut यांनी डोमकावळे म्हणत शिवसेनेला डिचवले)

ड्युनेडिन येथे १९६७ मध्ये डिक मोट्झच्या चेंडूने त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला होता, तरीही त्यांनी बिशेन बेदीसोबत शेवटच्या विकेटसाठी ५७ धावा केल्या. त्यांच्या या अतुलनीय कारकिर्दीसाठी आजही त्यांची प्रशंसा होते. ते भारतीय संघातले एकमेव वेगवान गोलंदाज असल्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष असायचं. देसाई हे १९९६ ते १९९७ या काळात निवड समितीचे अध्यक्ष होते. (Ramakant Desai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.