बाळासाहेबांचा फोटो, शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण न घेता निवडणूक लढा; Uddhav Thackeray यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

138

मिंदे आणि भाजपाला सांगतो तुम्ही जर षंड नसाल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न लावता धनुष्यबाणचिन्ह न घेता आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा. माझ्या वडिलांचा फोटो वापरता आणि मला स्ट्राइक रेट सांगतात. मिंद्येच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभासाठी मोदी तुम्ही सभा घ्या…या मिंदेला बाजूला ठेवा, असे आव्हान उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले.

राज ठाकरेंवर टीका 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालंय. फक्त उध्दव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी “बिनशर्ट” पाठींबा दिला, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे नको म्हणून काही जणांनी उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. दरम्यान, आपल्या भगव्या झेंड्यावर कुठलेच चिन्ह टाकू नका, आपल्या मशालीचा वेगळा प्रचार करा. छत्रपतींच्या भगव्यावर काहीच छापू नका, असा सल्ला उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला.

(हेही वाचा Sanjay Raut यांनी डोमकावळे म्हणत शिवसेनेला डिचवले)

सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणे, यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणे हा शासकीय नक्षलवाद आहे, असे शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या विरोधात चुकीचा प्रचार शहरी नक्षलवाद्यांनी केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता लढाई सुरू झाली, शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबायचे नाही. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की किती वेळ अजून निकालाला लागणार आहे. ही लढाई (पक्षाची कायदेशिर) वैयक्तीक नाही संविधान वाचवण्याची आहे, असे ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.