Maharashtra Monsoon : पुढील चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडणार

Maharashtra Monsoon : मुंबईतील काही भागांत आजही पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे. पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

158
Maharashtra Monsoon : पुढील चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडणार
Maharashtra Monsoon : पुढील चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडणार

संपूर्ण राज्यभरात मान्सूनचा पाऊस (Maharashtra Monsoon) पडत आहे. अनेक भागांत पावसाची संततधार (Rain Updates) पाहायला मिळत आहे. मुंबईत दडी मारून बसलेल्या पावसाने मात्र गेले २ दिवस दिलासा दिला. मुंबईत बुधवारपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही भागांत आजही पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे. पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Maharashtra Monsoon)

(हेही वाचा – Yerwada Jail मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन)

किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा

सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत किनारपट्टीसाठी पुढील चार दिवस पावसाची संततधार पाहायला मिळेल. त्यासाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आता अरबी समुद्रावरुन येणाऱ्या नैऋत्य मान्सूनचा जोर चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय. पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर पाहायला मिळेल. प्रामुख्यानं पुणे, सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगेकूच रखडली होती, मात्र आता मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्यभरात पाऊसाची रिमझिम लवकरच पहायला मिळणार आहे. बुधवारी दिवसभरात अलिबागमध्ये 38, डहाणू येथे 58, हर्णे येथे 11, सांताक्रुजमध्ये 6 आणि रत्नागिरीत 14 मिमी पाऊस पडला आहे. (Maharashtra Monsoon)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.