पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. सत्तेत येताच पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत दोनवेळा शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. नुकतेच, केंद्रीय मंत्रीमंडळाने 2024-25 साठी 14 खरीप पिकांच्या दरात म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. (MSP Increased)
केंद्रीय मंत्री मंडळात झालेल्या बैठकीत, कापसाचा नवीन पिकांच्या दरात वाढ करत 7,121 रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्याच्या दुसऱ्या जातीचा नवीन एमएसपी 7,521 रुपये करण्यात आला आहे, जो पूर्वीपेक्षा 501 रुपये अधिक आहे. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnav) म्हणाले की, देशात 2 लाख नवीन गोदामेही बांधली जातील. (MSP Increased)
नव्या एमएसपीमुळे सरकारवर 2 लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मागील पीक हंगामापेक्षा हे 35 हजार कोटी रुपये अधिक आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की एमएसपी पिकाच्या किंमतीच्या किमान 1.5 पट असावा.
(हेही वाचा – पहिले तेलुगू नाटककार Chandala Kesavadasu)
तूर डाळीच्या एमएसपीमध्ये 400 रुपयांनी वाढ
मका आणि डाळींच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तूर डाळीच्या एमएसपीमध्ये 550 रुपये प्रति क्विंटल आणि उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये 450 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (MSP Increased)
(हेही वाचा – Sea Turtles : कोकणात दीड लाखांहून अधिक सागरी कासवांचे संवर्धन)
यानंतर आता तूर डाळीचा एमएसपी 7550 रुपये प्रति क्विंटल आणि उडीद डाळीचा एमएसपी 7400 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. यासोबतच मक्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 135 रुपयांनी तर मूगाच्या एमएसपीमध्ये 124 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
पिके | MSP
2024-25 |
MSP
2023-24 |
MSP त किती वाढ? |
धान | 2300 | 2183 | 117 |
धान A ग्रेड | 2320 | 2203 | 117 |
ज्वारी हायब्रीड | 3371 | 3180 | 191 |
ज्वारी मालदंडी | 3421 | 3225 | 196 |
बाजरी | 2625 | 2500 | 125 |
रागी | 4290 | 3846 | 444 |
मक्का | 2225 | 2090 | 135 |
तूर | 7550 | 7000 | 550 |
मूग | 8682 | 8558 | 124 |
उडीद | 7400 | 6950 | 450 |
शेंगदाणे | 6783 | 6377 | 406 |
सूर्यफूल | 7280 | 6760 | 520 |
सोयाबीन | 4892 | 4600 | 292 |
तीळ | 9267 | 8635 | 632 |
रामतीळ | 8717 | 7734 | 983 |
कपाशी (मिडल स्टेपल) | 7121 | 6620 | 501 |
कपाशी (लाँग स्टेपल) | 7521 | 7020 | 501 |
(हेही वाचा – MPSC : टंकलेखन कौशल्य चाचणीचे १ ते १३ जुलै दरम्यान आयोजन)
एमएसपीमध्ये 23 पिकांचा समावेश आहे:
- 7 प्रकारचे धान्य (धान, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि बार्ली)
- 5 प्रकारच्या डाळी (हरभरा, अरहर/तुर, उडीद, मूग आणि मसूर)
- 7 तेलबिया (रेपसीड-मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई, नायजर बियाणे)
- 4 व्यावसायिक पिके (कापूस, ऊस, कोपरा, कच्चा ताग)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community