Dress Code Policy : विद्यार्थ्यांनी धर्माचे प्रदर्शन करीत महाविद्यालयात हिंडू नये; Chembur Trombay Education Society चे न्यायालयात स्पष्टीकरण

Dress Code Policy : चेंबूर ट्रॉम्बे सोसायटीच्या एन. जी. आचार्य आणि डी.के. मराठे महाविद्यालयाच्या परिसरात ड्रेसकोड लागू करण्यात आला असून हिजाब, नकाब, बुरखा, स्टोल्स, टोप्या आणि कोणत्याही प्रकारचे बॅजेस घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

168
Dress Code Policy : विद्यार्थ्यांनी धर्माचे प्रदर्शन करीत महाविद्यालयात हिंडू नये; Chembur Trombay Education Society चे न्यायालयात स्पष्टीकरण
Dress Code Policy : विद्यार्थ्यांनी धर्माचे प्रदर्शन करीत महाविद्यालयात हिंडू नये; Chembur Trombay Education Society चे न्यायालयात स्पष्टीकरण

महाविद्यालयात सर्वांनी समान गणवेशात यावे या उद्देशाने हिजाब, नकाब आणि बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामागे मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याचा हेतू नाही. विद्यार्थ्यांनी धर्माचे प्रदर्शन करीत महाविद्यालयाच्या परिसरात हिंडू नये हा यामागे उद्देश आहे, असे स्पष्टीकरण चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीने (Chembur Trombay Education Society) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिले आहे. चेंबूर ट्रॉम्बे सोसायटीच्या एन. जी. आचार्य आणि डी.के. मराठे महाविद्यालयाच्या परिसरात ड्रेसकोड लागू करण्यात आला असून हिजाब, नकाब, बुरखा, स्टोल्स, टोप्या आणि कोणत्याही प्रकारचे बॅजेस घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Dress Code Policy)

(हेही वाचा – MSP Increased: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप पिकांच्या हमी भावात वाढ, जाणून घ्या नविन दर काय आहेत?)

महाविद्यालयांच्या या आदेशाला विज्ञान शाखेत व्दितीय व तृतीय वर्षाच्या ९ विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर बुधवार, १९ जून रोजी न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे एकून घेतल्यानंतर पुढील आठवड्यात २६ जून रोजी आदेश देण्यात येतील, असे खंडपिठाने सांगितले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे

न्यायालयाने महाविद्यालयास विचारणा केली की, अशा प्रकारचे निर्बंध लादण्याचे अधिकार महाविद्यालच्या व्यवस्थापनास आहेत का ? यावर संस्थेचे वकील अनिल अंतूरकर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, केवळ मुस्लिम धर्मीयांसाठी नव्हे, तर सर्व जाती-धर्मासाठी हे निर्बंध लागू आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या धर्माचे प्रदर्शन करीत परिसरात हिंडू नये, यासाठी हा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. लोक महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. उर्वरित गोष्टी महाविद्यालयाबाहेरच ठेवाव्यात, असे अंतूरकर म्हणाले.

महाविद्यालयाचा नियम कायदेशीरदृष्ट्या विकृत

महाविद्यालयाच्या या नियमामुळे धर्माचे पालन करणे, व्यक्तिगत तसेच निवडीचा हक्क या मूलभूत हक्कावर गदा येत आहे. महाविद्यालयाचे हे नियम मनमानी, अनावश्यक आणि कायदेशीरदृष्ट्या विकृत असल्याचा दावा विद्यार्थिनींनी याचिकेत केला आहे. यावर अंतूरकर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, धर्माचे प्रदर्शन करण्याची गरजच काय ? उद्या विद्यार्थी पूर्ण भगवे वस्त्र परिधान करून आले, तर त्यालाही महाविद्यालय विरोध करेल. धर्म अथवा जातीचे प्रदर्शन मांडण्याची गरजच काय आहे, असा सवालही यांनी केला. वर्गात बसण्यापूर्वी हिजाब काढून ठेवण्यासाठी महाविद्यालयाने स्वतंत्र रूमही प्रदान केली आहे, याकडेही अंतूरकर यांनी लक्ष वेधले. (Dress Code Policy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.