Jammu-Kashmir: हादीपोरा येथील चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; 2 सुरक्षा कर्मचारी जखमी

155
Jammu-Kashmir: हादीपोरा येथील चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान; 2 सुरक्षा कर्मचारी जखमी

काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला (Baramulla) येथे सुरक्षा दल (security forces) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Attack among terrorists) झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला असून एक जवान आणि एक पोलिस जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झालीय. हादीपोरामध्ये पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या लपण्याच्या संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. (Jammu-Kashmir)

(हेही वाचा – T20 World Cup, SA vs USA : पहिल्या सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अमेरिकेवर १८ धावांनी विजय )

याआधी सोमवारी (17 जून) सकाळी सुरक्षा दलांनी बांदीपोरामध्ये दहशतवादी एलईटी कमांडर उमर अकबर लोन उर्फ ​​जाफरला ठार केले. तो पट्टणचा रहिवासी होता. या परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यांच्या शोधासाठी लष्कराचे ऑपरेशन सुरू आहे. रविवारी (16 जून) अरागमच्या जंगलात गोळीबाराचा आवाज आला. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोध घेतला. सोमवारी सकाळी शोधकार्य तीव्र केले असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ड्रोन फुटेजमध्ये ठार झालेल्या दहशतवादी जाफरचा मृतदेह जंगलात पडलेला दिसत होता. (Jammu-Kashmir)

(हेही वाचा – UGC-NET Exam Cancelled: पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय; केंद्राने प्रकरण सोपवले CBI कडे )

9 जूनपासून आतापर्यंत चार दहशतवादी हल्ले झाले आहेत

जम्मू आणि काश्मीर मध्ये 9 जूनपासून रियासी, कठुआ आणि डोडा येथे चार ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला. दरम्यान, एक नागरिक आणि सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. (Jammu-Kashmir)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.