विद्यार्थ्यांच्या नाटकात राम-सीतेच्या तोंडी अश्लील संवाद; IIT Bombayने ठोठावला ‘इतक्या’ रुपयांचा दंड

समितीच्या अहवालानंतर IIT Bombayच्या काही विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही विद्यार्थ्यांना ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना वसतिगृहाच्या सुविधाही नाकारण्यात आल्या होत्या.

170
IIT Bombayच्या विद्यार्थ्यांच्या नाटकात प्रभु श्रीराम आणि सीतेचे विडंबन; विद्यापिठाने ठोठावला 'इतक्या' रुपयांचा दंड
IIT Bombayच्या विद्यार्थ्यांच्या नाटकात प्रभु श्रीराम आणि सीतेचे विडंबन; विद्यापिठाने ठोठावला 'इतक्या' रुपयांचा दंड

आयआयटी मुंबईमध्ये (IIT Bombay) ३१ मार्च रोजी वार्षिक कला महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये सहभाग घेतांना काही विद्यार्थ्यांनी रामायणावर आक्षेपार्ह नाटक सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांना मोठा दंड ठोठावला आहे. आय.आय.टी. बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी ‘रहोवन’ (Raahovan) नावाचे नाटक सादर केले. या नाटकात विद्यार्थ्यांनी राम आणि सीतेच्या पात्रांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवले होते. या प्रकरणी संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर विद्यापिठाच्या शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर काही विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही विद्यार्थ्यांना ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना वसतिगृहाच्या सुविधाही नाकारण्यात आल्या होत्या. या प्रकरणी ८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Dress Code Policy : विद्यार्थ्यांनी धर्माचे प्रदर्शन करीत महाविद्यालयात हिंडू नये; Chembur Trombay Education Society चे न्यायालयात स्पष्टीकरण)

4 जून रोजी विद्यार्थ्याला दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. यापूर्वी, या नाटकाबाबत आलेल्या तक्रारींबाबत प्रशासनाने 8 मे रोजी शिस्तपालन समितीची बैठक बोलावली होती. विद्यार्थ्यांनीही या बैठकीत भाग घेतला होता आणि वाटाघाटीनंतर शिक्षेचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर देवाची खिल्ली उडवणाऱ्या विद्यार्थ्याला जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, त्याला 20 जुलै 2024 रोजी डीन ऑफ स्टुडंट अफेयर्सच्या कार्यालयात 1.20 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.

काय होते रहोवन नाटकात

रहोवन नाटक रामायणावर आधारित होते. त्यात प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांचे संवाद, तसेच हावभावही अश्लील दाखवण्यात आले होते. या नाटकात प्रभु श्रीराम सैतान असून तो माता सीतेशी हिंसकपणे वागत असल्याचेही दाखवण्यात आले होते. स्त्रीवादाच्या नावाखाली या नाटकात आक्षेपार्ह संवाद देण्यात आले आहेत. (IIT Bombay)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.