गेल्या अनेक दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात गुरुवार सकाळपासून पुन्हा सुरुवात केली आहे. ठाणे, पालघर (Thane, Palghar) ठिकाणी देखील पावसाची रिमझिम सध्या सुरू आहे. तसेच हवामान खात्याकडून मुंबई-पुण्यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं आहे. मात्र याच पावसाचा फटका मुंबईकरांची लाईफलाइन (Local Railway) असलेल्या रेल्वेलाही बसला आहे. (Mumbai Rain Update)
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी या भागात जोरदार पाऊस बरसतोय. तर गुरुवार सकाळपासून मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. दादर, वरळी या ठिकाणी देखील पावसाची रिमझिम सध्या सुरू आहे. अशातच येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देखील वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – IIT Bombayच्या विद्यार्थ्यांच्या नाटकात प्रभु श्रीराम आणि सीतेचे विडंबन; विद्यापिठाने ठोठावला ‘इतक्या’ रुपयांचा दंड)
मंगळवारी हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबईत ग्रीन अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यासह विदर्भात देखील यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. (Mumbai Rain Update)
मध्य, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
गुरुवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर (Central Railway and Western Railway) वाहतुकीवर परिणाम झाल्यातचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे. सिग्नल मिळत नसल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावरील अप व डाऊनची लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी व नोकरदार वर्गांना यांचा मोठा फटका बसला आहे.
(हेही वाचा – India’s New Coach : गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब?)
पालघर भागातही सकाळपासू जोरदार पाऊस झाल्याने त्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला. डहाणू विरार लोकल सेवा 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. ठिकठिकाणी ट्रॅक जवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहेत. ठिकठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या या गतीने सुरू असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Mumbai Rain Update)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community