मंगळवारी भर रस्त्यात आरती यादवची हत्या करणार्या आरोपी रोहीत यादव याला वसईच्या सत्र न्यायालयाने २४ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नालासोपार्यात राहणार्या २० वर्षीय आरती यादव (Aarti Yadav) या तरूणीची तिचा प्रियकर रोहीत यादव याने मंगळवारी सकाळी भर रस्त्यात डोक्यात लोखंडी पाना घालून हत्या केली होती. या हत्येचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. वालीव पोलीस (Waliv Police Station) या हत्याप्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करत आहे. दरम्यान ‘मुझे मेरी बेटी की जान के बदले जान चाहिए’ तरच माझ्या मुलीला न्याय मिळेल, अशा शब्दांत मृत युवती आरतीची आई निर्जलादेवी यादव (Nirjaladevi Yadav) यांनी न्यायाची याचना केली आहे. (Vasai Murder Case)
रडत रडत निर्जलादेवी म्हणाल्या की, माझ्या मुलीसोबत जे काही घडले आहे, तेच मारेकरी रोहित यादवच्या बाबतीत झाले पाहिजे, तरच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल.
(हेही वाचा – Hamare Baarah चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रदर्शनाचा रस्ता मोकळा; उच्च न्यायालय म्हणते, हा सामाजिक विषय)
आरोपी रोहित यादवसाठी त्याचे कुटुंबीय शाेधत होते मुलगी
आरती यादवची (Aarti Yadav) हत्या करणाऱ्या आरेापी रोहितबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीची बहीण सानियाने सांगितले की, रोहितचे कुटुंबीय त्याच्या लग्नासाठी मुलीचा शोध घेत होते. खुद्द रोहितने ही माहिती आरतीला दिली होती. त्यानंतर आरतीने रोहितला सांगितले की, त्याचे कुटुंब ज्या मुलीची निवड करतील तिच्याशी त्याने लग्न करावे. असे असतानाही त्याने माझ्या बहिणीची हत्या केली आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी हा संपूर्ण प्रकार घडताना पाहिला आणि वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, अशा लोकांचाही यादव कुटुंबीयांनी तीव्र निषेध केला आहे. माझ्या बहिणीच्या जागी गर्दीत उभ्या असलेल्या कुणाची बहीण असती तरीसुद्धा लोक असेच बघत राहिले असते का… असा सवाल सानिया यादवने (Saniya Yadav) घटनास्थळी उपस्थित असलेल्या बघ्या लोकांना केला आहे. (Vasai Murder Case)
(हेही वाचा – Vadhavan Port : वाढवण येथे 76,200 कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदर होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता)
मृत मुलीच्या वडिलांनी आरोपी रोहितला सांगितले होते, आधी घर घ्या, नंतर आपण लग्नाचे पाहू
आम्हाला ही बाब कळताच आम्ही तिला सांगितले की, आधी स्वतःचे घर घ्या, त्यानंतरच लग्न होईल. ही माहिती देताना पीडित मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, रोहितने त्या वेळी त्यांचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे कदाचित आता तो आपल्या मुलीला त्रास देणे थांबवेल असे त्यांना वाटले होते. मात्र, त्याने त्रास देणे सुरूच ठेवले आणि नंतर माझ्या मुलीची हत्या केली, असे आरतीचे वडील सांगत होते. (Vasai Murder Case)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community