- ऋजुता लुकतुके
न्यूझीलंडचा संघ टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) साखळीतच गारद झाल्यानंतर संघाचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) कप्तानीचा राजीनामा दिला आहे. इतकंच नाही तर त्याने न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket) मंडळाबरोबरचा मध्यवर्ती करारही सोडला आहे. पण, तो क्रिकेटमधून निवृत्त झालेला नाही. २०२४-२५ वर्षासाठी तो उपलब्ध असेल. तीनही प्रकारात खेळेल. (Kane Williamson)
KANE WILLIAMSON STEPPED DOWN AS NEW ZEALAND CAPTAIN….!!!!!
– End of an Era in New Zealand cricket. pic.twitter.com/y76PoZ5hsj
— Johns. (@CricCrazyJohns) June 19, 2024
विल्यमसनने केंद्रीय करारही सोडल्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘विल्यमसन उन्हाळ्यात परदेशी लीग खेळण्याची संधी शोधत आहे. या कालावधीत तो न्यूझीलंडकडून खेळू शकणार नाही, त्यामुळे त्याने केंद्रीय करार न घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं बोर्डाने कळवलं आहे. मात्र, न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी नेहमीच तयार असल्याचं विल्यमसनने सांगितले. म्हणजे करार नाही, पण, तो कराराशिवाय खेळायला तयार असेल. याशिवाय विल्यमसनने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छाही व्यक्त केली. (Kane Williamson)
Kane Williamson has declined the central contract. He’s keen to push youngsters who are working hard.
– Williamson, a class act as always! 🫡 pic.twitter.com/9T1v4E7Jah
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 19, 2024
विल्यमसनने (Kane Williamson) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत १०० कसोटी, १६५ एकदिवसीय आणि ९३ टी-20 आंतरराष्ट्रीय (T20 World Cup) सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ८,७४३ धावा, एकदिवसीय सामन्यात ६,८१० धावा आणि आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये २,५७५ धावा केल्या आहेत. विल्यमसनने कसोटीत ३२ आणि एकदिवसीय सामन्यात १३ शतके झळकावली आहेत. (Kane Williamson)
(हेही वाचा- Vasai Murder Case: पीडित मुलीच्या आईने न्यायासाठी केली याचना; म्हणाली “मुझे मेरी बेटी की जान…”)
प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या विल्यमसनची गणना आधुनिक क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. तो १० वर्षांहून अधिक काळ न्यूझीलंडच्या फलंदाजीचा प्राण आहे. विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली, न्यूझीलंडने २०१५ आणि २०१९ एकदिवसीय विश्वचषक, २०२१ टी-२० विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली, जी न्यूझीलंडने जिंकली. या चारपैकी तीन स्पर्धांमध्ये विल्यमसन न्यूझीलंडचे नेतृत्व करत होता. (Kane Williamson)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community