मराठी उद्योगपती Laxmanrao Kashinath Kirloskar

174
मराठी उद्योगपती Laxmanrao Kashinath Kirloskar

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे एक मराठी उद्योगपती होते. ते किर्लोस्कर ग्रुपचे संस्थापकही होते. लक्ष्मणरावांचा जन्म २० जून १८६९ साली बेळगाव इथल्या गुर्लाहोसुर नावाच्या गावात एका महाराष्ट्रीय कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचं नाव काशीनाथपंत असं होतं. ते वेदांचे पंडित होते. लक्ष्मणरावांनीही वेदांचा अभ्यास करून पंडित व्हावं, असं त्यांना वाटत होतं. पण तसं घडलं नाही. लक्ष्मणरावांना इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विषयात जास्त रस होता. (Laxmanrao Kashinath Kirloskar)

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना चित्रकला आणि यंत्रसाधने या दोन गोष्टींची खूप आवड होती. खरंतर लक्ष्मणरावांच्या वडिलांचा त्याला विरोध होता, पण त्यांचे मोठे भाऊ रामुअण्णा हे त्यांच्या पाठीशी होते. आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन ते आपल्या लहान भावाला मदत करत असत. रामुअण्णांच्या मदतीने १८८५ साली लक्ष्मणरावांनी मुंबई (त्याकाळी बॉम्बे) इथल्या सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवला. पण दुर्दैवाने त्यांना आपण रंगांध असल्याचं कळलं. म्हणून ते दोन वर्षानंतर तिथून बाहेर पडले. (Laxmanrao Kashinath Kirloskar)

(हेही वाचा – TamilNadu : विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू!)

पहिला लोखंडी नांगर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी तयार केला 

त्यांनी चित्रकला सोडली असली तरीही आपला यांत्रिक चित्रांचा अभ्यास सुरूच ठेवला. त्यांच्या या अंगकौशल्यामुळे पुढे त्यांना व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे मेकॅनिकल ड्रॉईंग टिचरच्या सहशिक्षक पदावर नोकरी लागली. त्यांना त्यावेळी दरमहा रु. ४५ एवढा पगार मिळायचा. १८९० च्या दशकाच्या सुरुवातीला लक्ष्मणरावांनी सायकलींची डीलरशिप सुरू केली. ते मुंबईत सायकलींची खरेदी करून बेळगावला आपले भाऊ रामुअण्णा यांच्याकडे पाठवत असत. रामुअण्णा त्या सायकली रु. ७०० ते रु. १००० पर्यंत विकत असत. तसेच सायकल शिकवण्यासाठी ते रु. १५ आकारत असत. (Laxmanrao Kashinath Kirloskar)

आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी बेळगावात सर्वात आधी सायकल दुरुस्तीचं एक लहानसं दुकान सुरू केलं. त्यानंतर शेतीसाठी वापरण्यात येणारा पहिला लोखंडी नांगर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी तयार केला. पण आपलं पाहिलं लोखंडी नांगर विकायला त्यांना दोन वर्षं लागली. १९१० साली लक्ष्मणरावांनी कुंडल रोड नावाच्या प्रसिद्ध रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पडीक जमिनीत आपला कारखाना सुरू केला. हा कारखाना प्रसिद्ध किर्लोस्कर इंडस्ट्रीज म्हणून ओळखला जातो. तसंच स्टेशनचं नाव कुंडल रोड वरून किर्लोस्करवाडी ठेवण्यात आलं आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर हे फक्त उद्योगपती नव्हते, तर ते थोर समाजसुधारकही होते. ग्रामीण भागात अस्पृश्यता पसरली होती, त्या वेळेस त्यांनी अस्पृश्यता दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी पळुस येथे वसवलेल्या किर्लोस्करवाडी नावाच्या वस्तीमध्ये अस्पृश्यतेवर बंदी घातली होती. (Laxmanrao Kashinath Kirloskar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.