Lok Sabha Adhiveshan : लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद आठ वेळा राहिले होते रिक्त

133
Lok Sabha Vice President : लोकसभा उपाध्यक्ष पदावरून महाभारत होण्याची शक्यता
  • वंदना बर्वे

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मागील १० वर्षांपासून रिक्त होते. काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी या मुद्यावरून भाजपाला धारेवर धरले होते. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातही विरोधी पक्षाचे नेतेपद रिक्त होते. देशाच्या इतिहासात आतापर्यंत आठ वेळा हे पद रिक्त राहिले आहे. (Lok Sabha Adhiveshan)

तब्बल १० वर्षांच्या संघर्षानंतर काँग्रेसला यावेळी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे एकूण लोकसभा सदस्यांच्या किमान १० टक्के जागा असणे आवश्यक आहे. यावेळी काँग्रेसकडे लोकसभेच्या ९९ जागा आहेत ज्या आवश्यक आकड्यापेक्षा जास्त आहेत. (Lok Sabha Adhiveshan)

१० वर्षांनंतर लोकसभेत असणार विरोधी पक्षनेतेपद

१० वर्षांनंतर देशाला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. हे पद २०१४ पासून आतापर्यंत रिक्त होते. मात्र यावेळी काँग्रेसकडे पुरेशा जागा आहेत. गेल्या १० वर्षात काँग्रेसच्या खासदारांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी १० टक्क्यांहून कमी होती. २०१४ मध्ये काँग्रेसचे ४४ तर २०१९ मध्ये ५२ जागा मिळाल्या होत्या. केवळ दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेतेपदाला मुकला होता. (Lok Sabha Adhiveshan)

(हेही वाचा – Vasai Murder Case: पीडित मुलीच्या आईने न्यायासाठी केली याचना; म्हणाली “मुझे मेरी बेटी की जान…”)

विरोधी पक्षनेतेपद कधीपासून रिक्त होते?

मात्र विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशात आतापर्यंत आठ वेळा हे पद खाली राहिले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात विरोधी पक्षनेते पद विरोधी पक्षांना मिळाले नव्हते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेत हे पद रिक्त राहिले. चौथ्या लोकसभेत राम सुभाग यांच्या रूपाने देशाला पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते मिळाले. पाचव्या, सातव्या आणि आठव्या लोकसभेतही हे पद रिक्त राहिले. (Lok Sabha Adhiveshan)

२०१४ मधील १६व्या लोकसभेत आणि २०१९ मधील १७व्या लोकसभेतही विरोधी पक्षाच्या नेत्यांना विरोधी पक्ष स्थापन करता आला नाही. १८व्या लोकसभेत पहिल्यांदाच नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्षनेतेपदाची संधी विरोधकांना मिळाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद एकूण आठ वेळा रिक्त राहिले आहे. (Lok Sabha Adhiveshan)

काँग्रेसला १० वर्षानंतर मोठी संधी

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजपा) २४० जागा मिळाल्या आहेत. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) लोकसभेच्या २९२ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र यावेळी विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेशा जागा आहेत. (Lok Sabha Adhiveshan)

या सुविधा उपलब्ध आहेत
  • विरोधी पक्षनेते हे पद कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीचे असते.
  • केंद्रीय मंत्र्याएवढे वेतन, भत्ते आणि इतर सुविधा मिळतात.
  • राहण्याची व ड्रायव्हरसह कारची सोय केली जाते. विरोधी पक्षनेत्यालाही कर्मचारी मिळतात. (Lok Sabha Adhiveshan)
विरोधी पक्षनेत्याचे अधिकार
  • विरोधी पक्षनेता हा सार्वजनिक लेखा, सार्वजनिक उपक्रम यासारख्या महत्त्वाच्या समित्यांचा सदस्य असतो. ते इतर अनेक संयुक्त संसदीय समित्यांचे सदस्यही आहेत. सीबीआय, केंद्रीय मानवधिकार आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोगाच्या प्रमुखांची नियुक्ती करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याला निवड समित्यांचे सदस्य बनवले जाते.
    विरोधी पक्षनेत्याला संसदेत सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य असते. (Lok Sabha Adhiveshan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.