Pune Crime News: पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर…घटनेनं खळबळ

298
Pune Crime News: पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर...घटनेनं खळबळ
Pune Crime News: पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर...घटनेनं खळबळ

पुण्यात पाण्याच्या (Pune Crime News) टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला आहे. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.मृतदेहाची ओळख पटली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण (Kaushalya Mukesh Chavan) असं या महिलेचं नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. (Pune Crime News)

पाणी सोडत असताना हा धक्कादायक प्रकार उघड

फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी कोंढवा येथून एक टँकर पाणी भरण्यासाठी हांडेवाडी येथे पॉवर हाऊसला आला होता. टँकरमध्ये पाणी भरताना मध्येच ते अडले गेले. त्यामुळे चालकाने खाली उतरून बघितले. तर त्याला महिलेचा मृतदेह दिसला. चालकाने तातडीने हडपसर पोलिस ठाण्यात खबर दिली. हडपसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आला. (Pune Crime News)

कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील

पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की, महिला पती आणि दोन मुलांसह उंड्री येथे राहते. हे कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील आहे. ते एक महिन्यापूर्वीच पुण्यात आले होते. तिचा पती फरशी बसवण्याचे काम करतो. तर ती मृत महिला समोरच्या एका इमारतीत कामाला जायची. तिला मानसिक आजार होता. यावर त्यांनी गावाकडे स्थानिक वैद्य व पुजाऱ्यांकडुन उपचार करुन घेतले होते. (Pune Crime News)

टँकरमध्ये पडली की उडी मारली?

दरम्यान, आज (२० जून) सकाळी ही महिला कामाला जाते म्हणून समोरच्या इमारतीत गेली होती. टँकर चालकही तिथेच राहतो. त्यामुळे त्याचा टँकरल ही तिथेच असतो. ती टँकरमध्ये पडली की उडी मारली हे मात्र सांगता येणार नाही. तिच्या अंगावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्युचे कारण स्पष्ट होईल. (Pune Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.