Varanasi Airport : वाराणसीच्या विमानतळाचा होणार कायापालट, केंद्राकडून २,८७० कोटींच्या कामांना मंजुरी

Varanasi Airport : वाराणसी विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार आहे. 

101
Varanasi Airport : वाराणसीच्या विमानतळाचा होणार कायापालट, केंद्राकडून २,८७० कोटींच्या कामांना मंजुरी
  • ऋजुता लुकतुके

नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी विमानतळाच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली. हे विमानतळ आता आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे आणि इतरही काही सुविधांसाठी तब्बल २,८७० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याविषयीही माहिती दिली. (Varanasi Airport)

महत्त्वाचा खर्च होणार आहे तो नवीन टर्मिनल इमारतीसाठी आणि आहे तो रन वे वाढवण्यासाठी. वाराणसी विमानतळावर वर्षाला ९९ लाख प्रवासी ये-जा करू शकतील इतकी क्षमता वाढवण्यात येणार आहे. सध्या या विमानतळावर ३९ लाख प्रवाशी वर्षाला हाताळले जाऊ शकतात. (Varanasi Airport)

(हेही वाचा – Vidhan Parishad Election : विधानसभेआधी विधान परिषद निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू)

वाराणसी विमानतळावरील प्रस्तावित नवीन टर्मिनल इमारत ७५,००० वर्ग मीटर जागेवर उभारण्यात येईल. गर्दीच्या वेळी एकाचवेळी ५,००० प्रवासी या इमारतील हाताळले जाऊ शकतील. तसंच हे विमानतळ उत्तर भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं दर्शन जगाला घडवून देणारं असेल, असं वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. रनवे वाढवला जाऊन त्याला जोडून एक एप्रन बांधण्यात येणार आहे जिथे एकावेळी २० विमानं थांबवता येतील. (Varanasi Airport)

वाराणसी विमानतळाबरोबरच महाराष्ट्रात डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे. (Varanasi Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.