रायगडावर तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त व सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रायगडावर केलेल्या कृतीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा –Latur Crime News: धक्कादायक! इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!)
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला मदत करत आहेत. मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे अशी चेष्टा करणाऱ्या लोकांची थोबाडं बंद करण्याचं काम पुन्हा पंतप्रधानांनी केलं. मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली, उद्घाटनही केलं. ५००वर्षांपासूनचं राम मंदिराचं स्वप्न होतं. ते बाळासाहेब ठाकरेंचंही स्वप्न होतं, रामभक्तांचंही स्वप्न होतं. ते पूर्ण करण्याचं काम मोदींनी केलं. मी आपल्या सगळ्यांकडून त्यांना धन्यवाद देतो.”
“हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शांवर चालणारं आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत, मनामनांत शिवछत्रपती आहेत. हे सरकार छत्रपतींच्या आशीर्वादानेच काम करतंय. महाराजांच्या किल्ल्यांचं रक्षण, संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम राज्य सरकारने घेतलेलं आहे.” असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. (CM Eknath Shinde)
अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य
# Live📡| 20-06-2024 📍रायगड किल्ला, रायगड
🎥 शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यातून लाईव्ह https://t.co/dtG6mA1MBf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 20, 2024
दरम्यान, यावेळी सरकारच्या कामकाजाचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी अचानक अजित पवारांचा हात उंचावून भाष्य केलं. “मी न बोलता जास्त काम करतो. मी जास्त बोलणार नाही. पण योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम मी करेन. तुम्ही खात्री बाळगा. हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे. आणि माझ्यासोबत अजितदादापण आहेत”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एवढा वेळ बाजूला उभ्या असलेल्या अजित पवारांचा हात हातात घेऊन धरला. यावेळी अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं. (CM Eknath Shinde)
“महाराजांचा विषय निघतो तेव्हा सुधीर मुनगंटीवारांच्या अंगात रोमांच उभा राहतो”
यानंतर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “माझ्यासोबत देवेंद्र फडणवीसही आहेत. आमचे सुधीर मुनगंटीवारही आहेत. शिवाजी महाराजांचा विषय निघतो तेव्हा सुधीर मुनगंटीवारांच्या अंगात रोमांच उभा राहतो. हे खरे शिवभक्त आहेत.” असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनीही हसून या कौतुकाचा स्वीकार केला. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community