अनेक फसवणुकीचे प्रकार तुम्ही ऐकले असतील, पाहिले असतील, पण साताऱ्यात एका बंटी आणि बबलीने चक्क पंतप्रधान कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार असल्याचे आणि रॉ एजंट असल्याचे भासवून अनेकांना फसवले (Fraud) आहे.
मोठ-मोठे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले
सहा वर्षांपूर्वी कश्मीरा पवार या साताऱ्यातील २४ वर्षाच्या तरुणीने आपण प्रधानमंत्री कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार झाली असल्याची खोटी बातमी पेरली. तिचा साथीदार गणेश गायकवाड याने देखील आपण रॉ एजंट असल्याचे सगळीकडे सांगायला सुरुवात केली. हे दोघे लोकांना आम्ही मोठ्या पदावर असल्याचे भासवत मोठ-मोठे टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवू (Fraud) लागले. राज्यात अनेक ठिकाणी या बंटी आणि बबलीने अनेकांना मोठमोठ्या रकमांना फसवले (Fraud) आहे. सध्या या दोघांवर पुणे आणि सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून सातारा पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतला आहे.
(हेही वाचा Latur Crime News: धक्कादायक! इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याने आईची मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!)
तक्रारी दाखल करण्याचे पोलिसांचे आवाहन
गोरख मरळ यांना ५० लाख, फिलिप भांबळ यांना २६ लाख आणि चंद्रशेखर पवार यांना ७ लाख रुपयांना फसवले आहे. तिघांची फसवणूक केल्याच्या आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्या आहेत. अनेक लोकांची या दोघांनी फसवणूक (Fraud) केली आहे, मात्र भीतीपोटी तक्रार देण्यासाठी ते पुढे येत नाहीत, मात्र पोलिसांनी अशा फसवणूक (Fraud) झालेल्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community